शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

मुदत ठेवीतील १८ लाख रुपये १२.५ टक्के व्याजासह अदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:07 IST

नागपूर : तक्रारकर्ते ग्राहक डॉ. हरिभाऊ शेगावकर यांना मुदत ठेवीचे १८ लाख रुपये १२.४ टक्के व्याजासह अदा करा, असा ...

नागपूर : तक्रारकर्ते ग्राहक डॉ. हरिभाऊ शेगावकर यांना मुदत ठेवीचे १८ लाख रुपये १२.४ टक्के व्याजासह अदा करा, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने आनंदसाई क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद घोघरे व सहकारी अधिकारी-१ चंद्रशेखर बोदड यांना दिला आहे. व्याज एप्रिल-२०१८ ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. तसेच, शेगावकर यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ४० हजार व तक्रार खर्चापोटी २० हजार रुपये भरपाईही मंजूर करण्यात आली आहे.

आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांच्या समक्ष प्रकरणावर सुनावणी झाली. आयोगाने याशिवायही विविध आदेश दिले असून, त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी प्रतिवादींना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. प्रकरणातील माहितीनुसार, डॉ. शेगावकर यांनी वैद्यकीय सेवेतून निवृत्त झाल्‍यानंतर मिळालेल्या रकमेतील १८ लाख रुपयांची आनंदसाई सोसायटीमध्ये मुदत ठेव केली. त्यांना या रकमेच्या व्याजापोटी दर महिन्याला १८ हजार ७५० रुपये मिळत होते. एप्रिल-२०१८ पासून त्यांना व्याज देणे बंद करण्यात आले. सदर मुदत ठेव १३ डिसेंबर २०१८ रोजी परिपक्व झाली. त्यानंतर सोसायटीने त्यांना मुदत ठेवीच्या रकमेसह थकीत व्याजही दिले नाही. त्‍यामुळे शेगावकर यांनी २४ डिसेंबर २०१८ रोजी हुडकेश्‍वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी, त्यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. त्यात रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता हा निर्णय देण्यात आला. सोसायटीने शेगावकर यांना त्रुटीपूर्ण सेवा दिली. तसेच, त्यांच्यासोबत अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला, असे निरीक्षण निर्णयात नाेंदवण्यात आले.

============

सोसायटीने उत्तर सादर केले नाही

ग्राहक आयोगाची नोटीस तामील होऊनही आनंदसाई सोसायटीने आयोगासमक्ष हजर होऊन उत्तर सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एकतर्फी कारवाई करण्यात आली. सहकारी अधिकारी-१ चंद्रशेखर बोदड यांनी लेखी उत्तर सादर करून सोसायटीवर आजही संचालक मंडळ कार्यरत असल्यामुळे रक्कम परत करण्याची जबाबदारी संचालक मंडळाचीच आहे, असा दावा केला होता. तसेच, या तक्रारीतील प्रतिवादींमधून वगळण्याची विनंती केली होती.