शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमध्ये रुग्णाची आत्महत्या

By admin | Updated: August 9, 2015 02:29 IST

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या एका कॅन्सरच्या रुग्णाने शुक्र वारी मध्यरात्री गळफास लावून आत्महत्या केली.

नागपूर : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या एका कॅन्सरच्या रुग्णाने शुक्र वारी मध्यरात्री गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने रुग्णालयात खळबळ उडाली आहे. बुद्धदास अमित बोरकर (६५) रा. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मोहरना, असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुद्धदास बोरकर यांना काही दिवसांपूर्वी मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथे त्याच्यावर तीन वेळा बायोप्सी (पॅथालॉजी परीक्षणाकरिता शरीराचा लहानसा भाग कापणे) करण्यात आली होती, परंतु याचा अहवाल अचूक येत नव्हता. अखेर नातेवाईकांनी कंटाळून बुद्धदास यांना ३० जुलै रोजी मेडिकलच्या शल्यशस्त्रक्रियेचा वॉर्ड क्र. १२ मध्ये भरती केले. येथे आल्यापासून त्यांच्या वागण्यात बदल झाला होता. शुक्रवारी त्याच्या देखभालीसाठी त्याची पत्नी सोबत होती. रात्री १.३० वाजताच्या सुमारास बुद्धदासच्या पत्नीला जाग आली असताना ते खाटेवर दिसून आले नाहीत. तिने वॉर्ड व परिसरात त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कुठेच आढळून आले नसल्याने स्वच्छतागृहाची तपासणी केली असता खिडकीच्या गजाला दुप्पटा अडकवून बुद्धराज लटकलेले असल्याचे दिसून आले. तिने लागलीच आरडाओरड केली. परिचारिका व अटेन्डटने धावत येऊन त्यांना खाली उतरविले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांना मृत घोषित केले. या प्रकारामुळे वॉर्डातील रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. कॅन्सरपीडित असल्या कारणाने बोरकर यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. अजनी पोलीस पुढील तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)