शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

प्रवाशांनो, रेल्वेत अधिकृत विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ घ्या; प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन

By नरेश डोंगरे | Updated: May 13, 2024 20:09 IST

मध्य रेल्वेकडून अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कारवाईची मोहीम

नागपूर : प्रवाशांनी रेल्वे स्थानक परिसर किंवा रेल्वे गाड्यांमध्ये अधिकृत खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडूनच खाण्यापिण्याच्या चिजवस्तू आणि पेये खरेदी करावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आज एका प्रसिद्धीपत्रकातून केले आहे. लोकमतने गेल्या काही दिवसांत अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडून रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे वृत्त सातत्याने प्रकाशित करण्याची भूमिका घेतली आहे, हे विशेष !

विविध ठिकाणच्या रेल्वे स्थानक परिसरात आणि रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत विक्रेते (वेंडर) दर्जाहिन, शिळे खाद्यपदार्थ, विविध प्रकारची शितपेये आणि पाणी विकून प्रवाशांच्या आरोग्यांशी खेळत आहेत. बल्लारशाह आणि नागपूर रेल्वे स्थानकावर अशाच प्रकारे बिर्याणी विकण्यात आल्याने गोरखपूर एक्सप्रेसमधील ७० प्रवाशांना दोन आठवड्यांपूर्वी विषबाधा झाली होती. वर्धा स्थानकावर मुदतबाह्य दुध आणि कॉफीच्या पाकिटची विक्री करण्यात येत होती. तर, रेल्वे गाड्यांच्या टॉयलेटमध्ये चहा तयार करून विकला जात असल्याचे वृत्त लोकमतने सोमवारी, १३ मे च्या अंकात प्रकाशित केले होते. त्याची मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. आज या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने प्रसिद्धीपत्रक काढून प्रवाशांना खाण्या-पिण्याच्या चिजवस्तू रेल्वेच्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.

रेल्वे स्थानक आणि गाड्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या पॅकेजवर ते तयार करण्यात आल्याची तारीख आणि वेळ एका स्टिकरवर नमूद असते. ते स्टिकर तपासण्याची विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे. ज्या पॅकेजवर तारीख आणि वेळ नमूद केलेले स्टिकर नसेल ते अन्न खरेदी करू नये. खबरदारीचा उपाय म्हणून खरेदी केलेले अन्न, शिजवल्यापासून चार तासांच्या आत खावे. त्याचप्रमाणे फक्त अधिकृत असलेले 'रेल नीर' हेच पिण्याचे पाणीच खरेदी करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. विक्रेत्याची शहानिशा करा, तात्काळ तक्रार करारेल्वे स्थानक किंवा गाड्यांमध्ये पदार्थ तसेच पेयाबद्दल किंवा ते विकणाऱ्यांबद्दल संशय आला तर तात्काळ १३९ क्रमांकावर तक्रार करा. 'रेल मदत' या पोर्टलवरही प्रवासी तक्रार नोंदवू शकतात, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. बल्लारशाह स्थानकावर पाण्याच्या बाटल्या जप्त११ ते १३ मे २०२४ या तीन दिवसांत अनधिकृत वेंडरविरुद्ध राबविण्यात आलेल्या कारवाईच्या मोहिमेत रेल्वेच्या चमूंनी २१ वेंडरला अटक केली. तत्पूर्वी २७ विक्रेत्यांना पकडण्यात आले होते. १३ मे रोजी बल्लारशाह रेल्वे स्थानकावर प्रतिबंध असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे ८ बॉक्स रेल्वे अधिकाऱ्यांनी पकडले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर