शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांकडून लालपरीचे लाड बंद; एसटी महामंडळाला चपराक, प्रवाशांनी पाठ फिरविल्याने जबर आर्थिक फटका

By नरेश डोंगरे | Updated: October 5, 2025 21:40 IST

St Bus News: प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून प्रवास भाड्यात वाढ करणाऱ्या एसटी महामंडळाला राज्यातील प्रवाशांनी सणसणीत चपराक लगावली. त्यांनी लालपरीचे लाड बंद करून प्रवासासाठी दुसरे पर्याय शोधल्यामुळे एसटी महामंडळाला जबर आर्थिक फटका बसला.

- नरेश डोंगरेनागपूर - प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून प्रवास भाड्यात वाढ करणाऱ्या एसटी महामंडळाला राज्यातील प्रवाशांनी सणसणीत चपराक लगावली. त्यांनी लालपरीचे लाड बंद करून प्रवासासाठी दुसरे पर्याय शोधल्यामुळे एसटी महामंडळाला जबर आर्थिक फटका बसला. त्यामुळे भानावर आलेल्या एसटी महामंडळाने दिवाळीच्या तोंडावर 'आवडेल' अशी घसघशीत भाडेकपात केली आहे.

गेल्या दोन वर्षांत एसटी महामंडळाच्या लालपरीचे प्रवाशांनी भरभरून लाड पुरविणे सुरू केले आहे. परिणामी एसटीची प्रत्येक गाडी प्रवाशांनी खच्चून भरून धावताना दिसते आहे. महामंडळाच्या उत्पन्नात त्यामुळे मोठी वाढ झाल्यामुळे की काय, एसटी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भाडेवाढीचा निर्णय घेतला. २४ जानेवारी २०२५ पासून ही भाडेवाढ झाली. त्यानंतर १ ऑक्टोबर २०२५ पासून 'आवडेल तेथे प्रवास योजनेच्या पास'मध्येही मोठी रक्कम वाढवली. एसटीच्या अनेक मार्गावर खटारा बसेस धावतात. त्यांचा खडखडाट सहन करणाऱ्या प्रवाशांना भाववाढीच्या माध्यमातून एसटीने रंग बदल्याचे अजिबात आवडले नाही. त्यांनी लालपरीचे लाड कमी करून तिच्याकडे पाठ फिरविणे सुरू केले. परिणामी एसटीच्या प्रवाशी संख्येत सहा महिन्यांपासून सारखी घट होऊ लागली.

त्याचा परिणाम एसटीच्या तिजोरीवर झाला. बसेस प्रमाणे एसटीच्या तिजोरीतही खडखडाट होत असल्याचे पाहून महामंडळाचे पदाधिकारी भानावर आले आणि त्यांनी अखेर प्रवाशांनाचुचकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता एसटीच्या आवडेल तेथे प्रवास योजनेच्या पासचे दर एकूण रकमेच्या २५ टक्के पेक्षा कमी करण्यात आले आहे. ७ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून हे दर लागू केले जाणार आहे. शनिवारी तशा प्रकारची सूचना एका परिपत्रकातून महामंडळाने आपल्या अधिकाऱ्यांना दिली आहे.

सुधारित प्रवास दरआवडेल त्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी चार आणि सात दिवसांचा प्रवासी पास मिळतो. प्राैढ प्रवाशांना त्यासाठी १८१४ रुपये मोजावे लागतात. ७ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून मात्र या पाससाठी १३६३ रुपये द्यावे लागतील. अर्थात या पासचे दर ४५० रुपयांनी कमी होतील. तर, पालकांसह प्रवास करणाऱ्या ५ वर्षांपेक्षा जास्त आणि १२ वर्षांपेक्षा कमी असलेल्या मुलांना ही पास सध्या ९१० रुपयांत मिळते. नव्या दरानुसार ती ६८५ रुपयांत मिळेल. अर्थात मुलांच्या पासची किंमत २२५ रुपयांनी कमी होईल. त्याच प्रमाणे सात दिवसांचा पास जो सध्या ३१७१ रुपयांत मिळतो. त्याची किंमत ७८९ रुपयांनी कमी होणार असून तो पास २३८२ रुपयांना मिळणार आहे. मुलांसाठी या पासची किंमत १५८८ रुपये आहे. ती ३९४ रुपयांनी कमी होऊन ११९४ रुपयांवर स्थिरावणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Passengers Reject Fare Hike; State Transport Corporation Faces Financial Blow

Web Summary : Passengers shunned Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) after fare hikes, causing losses. MSRTC reduced fares before Diwali to attract travelers back, decreasing pass prices by up to 25%.
टॅग्स :state transportएसटीnagpurनागपूर