शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगड एक्स्प्रेसमधील प्रवासी बचावले

By admin | Updated: June 4, 2017 01:30 IST

राजधानी एक्स्प्रेसचा पेंटो ओएचई तारेला अडकल्यामुळे या गाडीची कपलिंग तुटून कोचला सोडून इंजिन पुढे गेले होते.

मोठा अनर्थ टळला : ‘अँकर लिंक’चे झाले होते तुकडेनागपूर : राजधानी एक्स्प्रेसचा पेंटो ओएचई तारेला अडकल्यामुळे या गाडीची कपलिंग तुटून कोचला सोडून इंजिन पुढे गेले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री छत्तीसगड एक्स्प्रेसच्या ‘अँकर लिंक’चे तुकडे तुकडे झाल्याची गंभीर घटना पुढे आली आहे. वेळीच नागपूर रेल्वेस्थानकावर नवे अँकर लावल्यामुळे संभाव्य मोठा अपघात टाळता आला.मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेगाडी क्रमांक १८२३७ बिलासपूर-अमृतसर छत्तीसगड एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री १० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आली. कॅरेज अ‍ॅन्ड वॅगनच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वेगाडीची नियमित तपासणी केली असता इंजिनच्या अखेर जोडलेल्या एसएलआर कोच (०६७०४)च्या चेसिस(ट्रॉली)मध्ये लावलेल्या अँकर लिंकचे तुकडे तुकडे झाल्याचे लक्षात आले. त्वरित अँकर लिंक दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले. कोचच्या चेसिसला नवे अँकर लिंक लावण्यात आले. या कामात दोन तासांचा वेळ लागला. त्यानंतर ही गाडी रात्री १२.१० वाजता इटारसीकडे रवाना करण्यात आली. जर नागपुरात अँकर लिंकचे तुकडे झाल्याची बाब निदर्शनास आली नसती तर रेल्वेगाडी रुळावरून घसरून मोठी जीवितहानी होण्याची घटना घडली असती. अँकर लिंक देतो कोचला दिशारेल्वेगाडीच्या कोचच्या चेसिस(ट्रॉली)मध्ये अँकर लिंक लावलेले असते. कोचला दिशा दाखविण्यात अँकर लिंकची भूमिका महत्त्वाची असते. रेल्वे रुळ बदलताना केवळ ट्रॉलीची मुव्हमेंट होते. हे काम अँकर लिंकशिवाय शक्य होत नाही. छत्तीसगड एक्स्प्रेसचा अँकर लिंक तुटल्यामुळे हे कार्य शक्य न होऊन गाडी रुळाखाली घसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.रायपूर, बिलासपूरला का आढळल्या नाही त्रुटी?छत्तीसगड एक्स्प्रेस नागपूरला येण्यापूर्वी रायपूर आणि बिलासपूर रेल्वेस्थानकावर या गाडीची ‘इन रुट’ तपासणी झाली होती. दरम्यान, या गाडीच्या एसएलआर कोचची अँकर लिंक तुटल्याची बाब त्यांना का दिसली नाही? दिसली तर ती दुरुस्त का केली नाही? या प्रश्नांची उत्तरे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा यांत्रिक विभागच देऊ शकतो.