शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

राज्यातील बसस्थानकांवर होणार ‘पार्सल स्टोअर रूम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 10:35 AM

लहान व्यापारी, नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एसटी महामंडळाने किरकोळ वाहतूक सुरू करण्याचा विचार सुरू केला असून त्यासाठी लवकरच राज्यभरातील बसस्थानकांवर ‘पार्सल स्टोअर रूम’ साकारणार आहेत.

ठळक मुद्देकिरकोळ वाहतूक होणार सुरूलहान व्यापाऱ्यांसाठी एसटीची योजना

दयानंद पाईकरावलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनामुळे एसटीच्या बसेस ठप्प झाल्या आहेत. यात महामंडळाने उत्पन्नाचे साधन म्हणून एसटीच्या बसेस ट्रकमध्ये रूपांतरित करून माल वाहतुकीला सुरुवात केली आहे. परंतु सर्वांनाच एसटीचा ट्रक बुक करणे शक्य नसते. एक किंवा दोन टन माल असल्यास त्यांची पंचाईत होते. लहान व्यापारी, नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एसटी महामंडळाने किरकोळ वाहतूक सुरू करण्याचा विचार सुरू केला असून त्यासाठी लवकरच राज्यभरातील बसस्थानकांवर ‘पार्सल स्टोअर रूम’ साकारणार आहेत.

एसटी महामंडळाचे उत्पन्न कोरोनाच्या संकटामुळे ठप्प झाले आहे. यातून सावरण्यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांनी शक्कल लावून माल वाहतुकीचा पर्याय शोधून काढला आहे. खासगी वाहतूकदारांच्या तुलनेत एसटीच्या माल वाहतुकीचे दर परवडणारे असल्यामुळे एसटीच्या माल वाहतुकीला चांगला प्रतिसादही मिळत आहे. परंतु प्रत्येकाला संपूर्ण ट्रक बुक करणे शक्य नसते. अनेकांना एक, दोन किंवा तीन टन माल पाठवावा लागतो. त्यामुळे पूर्ण ट्रक बुक करणे त्यांना परवडत नाही. त्यावर पर्याय शोधून एसटीच्या अधिकाऱ्यांनी ‘पार्ट लोड’ म्हणजे किरकोळ वाहतूक सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी एसटीचे अधिकारी, कर्मचारी बाजारात फिरून दररोज कोणते व्यापारी माल पाठवितात, याची चाचपणी सुरू आहे. त्यानंतर या व्यापाऱ्यांचा माल बसस्थानकांवर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरातील बसस्थानकांवर ‘पार्सल स्टोअर रूम’ तयार करण्यात येणार आहेत. व्यापाऱ्यांचा किरकोळ माल या पार्सल स्टोअर रूममध्ये ठेवून तो संबंधित ठिकाणी रवाना करण्यात येईल. तसेच इतर ठिकाणांवरून आलेला मालही स्थानिक व्यापारी या पार्सल स्टोअर रूममधून नेऊ शकणार आहेत. किरकोळ वाहतूक सुरू केल्यानंतर एसटीच्या माल वाहतुकीला राज्यभरात अजून प्रतिसाद मिळून एसटीचे उत्पन्न वाढणार असल्याचा दावा एसटीच्या अधिकाºयांनी केला आहे.लवकरच साकारणार ‘पार्सल स्टोअर रूम’‘एसटीच्या माल वाहतुकीला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु लहान व्यापाऱ्यांसाठी एसटीने किरकोळ वाहतूक सुरू करण्याचा विचार केला आहे. त्यासाठी राज्यातील बाजारपेठात चाचपणी सुरू आहे. या व्यापाऱ्यांचा माल ठेवण्यासाठी एसटीच्या राज्यभरातील बसस्थानकांवर लवकरच पार्सल स्टोअर रूम साकारण्यात येतील.’-वैभव वाकोडे, यंत्र अभियंता, मुंबईट्रकची संख्या वाढविणार‘एसटी महामंडळाच्या माल वाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ट्रकची संख्या कमी पडत आहे. लवकरच आणखी एसटी बसेसचे ट्रकमध्ये रूपांतर करून किरकोळ माल वाहतुकीला सुरुवात करण्यात येणार आहे.’-शिवाजी जगताप, उपमहाव्यवस्थापक, नियंत्रण समिती ३, मुंबई 

 

टॅग्स :state transportएसटी