शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

विरोधाच्या नावावर पानतावणेंचा छळ झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:10 PM

डॉ. गंगाधर पानतावणे यांचा लहान भाऊ सदानंद हा संंघाचा स्वयंसेवक होता यात पानतावणेंचा काय दोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत: रिपब्लिकन पक्ष हा एका जातीचा असू नये अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या अपेक्षेला अनुसरून पानतावणेंनी कार्य केले तर ते संघाचे समर्थक कसे ठरतात, असा सवाल उपस्थित करून समाजातील काही तथाकथित विचारवंतांनी विरोधाच्या नावावर पानतावणेंचा अक्षरश: छळ केला, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देरणजित मेश्राम : डॉ. गंगाधर पानतावणे यांना आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डॉ. गंगाधर पानतावणे यांचा लहान भाऊ सदानंद हा संंघाचा स्वयंसेवक होता यात पानतावणेंचा काय दोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत: रिपब्लिकन पक्ष हा एका जातीचा असू नये अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या अपेक्षेला अनुसरून पानतावणेंनी कार्य केले तर ते संघाचे समर्थक कसे ठरतात, असा सवाल उपस्थित करून समाजातील काही तथाकथित विचारवंतांनी विरोधाच्या नावावर पानतावणेंचा अक्षरश: छळ केला, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम यांनी व्यक्त केली. विदर्भ साहित्य संघ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने विदर्भ साहित्य संघाच्या चौथ्या माळ्यावरील सभागृहात बुधवारी आयोजित डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या आदरांजली सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी तर प्रमुख वक्ते म्हणून दलित साहित्याचे अभ्यासक ताराचंद्र खांडेकर व भाऊ लोखंडे उपस्थित होते. मेश्राम पुढे म्हणाले, पानतावणेंच्या विरोधकांनी केवळ व्यक्ती म्हणून पानतावणेंनाच नाही तर त्यांच्या अक्षर कर्तृत्वाला संपवण्याचा प्रयत्न केला. पण, पानतावणेंची अंगभूत सहनशीलता कमालीची होती. चौफेर होणारा विरोध पचवून त्यांनी माणूसमुक्तीचा वसा घेतलेल्या आंबेडकरी तत्त्वज्ञानाला समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचविण्याचे कार्य नेटाने केले. ताराचंद्र खांडेकर म्हणाले, पानतावणे आणि माझा परिचय तेव्हाच्या मॉरिस कॉलेजमध्ये झाला. ते मला दोन वर्ष सिनिअर होते. परंतु आमच्यात छान मैत्री होती. केवळ मैत्रीने नाही तर आंबेडकरांच्या विचारांनी आम्हाला परस्परांशी जोडले होते. पानतावणेंचे वैचारिक कार्य संक्रमणाच्या काळात सुरू झाले. भूतकाळाचे चटके दलित समाज विसरला नव्हता आणि तिकडे बाबासाहेबांनी एक नवा विचार तरुण दलित पिढीपुढे ठेवला होता. पानतावणेंनी हा विचार स्वीकारला आणि अवघे आयुष्य त्याला समर्पित करून टाकले. यावेळी भाऊ लोखंडे यांनीही पानतावणेंसोबतच्या चळवळीतील आठवणींचा पट उलगडला. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात पानतावणेंनी स्वत:च्या अस्मितेची ओळख करून देणारा आरसा आपल्या विचारातून समाजासमोर ठेवल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. इंद्रजित ओरके यांनी केले.

टॅग्स :Vidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघnagpurनागपूर