शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

नृत्याविष्काराने रंगली ‘पैंजनिया बोल’ स्पर्धा

By admin | Updated: November 12, 2014 00:57 IST

क्लासिकल, सेमीक्लासिकल, युगुल व फोक डान्स स्पर्धेतून सादर करण्यात आलेल्या भन्नाट कल्पना आणि अंगभूत कलागुणांच्या सादरीकरणांमुळे ‘पैंजनिया बोल’ नृत्यस्पर्धेची अंतिम फेरी रंगली.

रॉक, हिपपॉपसोबतच शास्त्रीय नृत्य : नृत्यातही वापरली भन्नाट कल्पनानागपूर : क्लासिकल, सेमीक्लासिकल, युगुल व फोक डान्स स्पर्धेतून सादर करण्यात आलेल्या भन्नाट कल्पना आणि अंगभूत कलागुणांच्या सादरीकरणांमुळे ‘पैंजनिया बोल’ नृत्यस्पर्धेची अंतिम फेरी रंगली. बाल व युवा कलावंताच्या कलाविष्काराने प्रेक्षक भारावून गेले होते. लोकमत युवा नेक्स्ट, कॅम्पस क्लब व हार्मोनी इव्हेंटसच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या एकाचवेळी विविध नृत्य प्रकारातील स्पर्धेला बाल सोबतच युवा कलावंतांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ६ ते १४ आणि १५ ते ३० या वयोगटातील ३०० वर स्पर्धक प्राथमिक फेरीत सहभागी झाले होते. अंतिम फेरीत प्रत्येक कलावंतांच्या नृत्य शैलीचा कस लागला. या स्पर्धेमुळे हल्ली गाजत असलेल्या रॉक डान्स, हिपपॉप, फ्री स्टाईल, डिस्को या गजबजाटात शास्त्रीय नृत्याने आपली ओळख कायम ठेवल्याचे दिसून आले. यात कलावंतांच्या नृत्यातील सच्चेपणा समोर आला. स्पर्धेत सोलो डान्समध्ये प्युअर क्लासिकलमध्ये भरतनाट्यम, कथ्यक, मोहीअहम, कुचीपुडी, सेमी क्लासिकलमध्ये फिल्मी, भजन, नॉन फिल्मी, ड्युएटमध्ये क्लासिकल, सेमिक्लासिकल आणि फोक डान्स, ग्र्रुपमध्ये क्लासिकल, सेमी क्लासिकल आणि फोक डान्सचा समावेश होता. प्रत्येक नृत्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत होता. विशेष म्हणजे, नृत्यातही कल्पनेचा वापर करण्यात आल्याने स्पर्धा चुरशीची ठरली. स्पर्धेचे बक्षीस वितरण व्हीएनआयटी महाविद्यालयाचे धर्मेश पराते, रॉयल डेव्हल्पर्सच्या संचालिका सोनाली धोंडारकर व हार्मोनी इव्हेंट्सचे संचालक राजेश समर्थ यांच्या हस्ते झाले. परीक्षकांची जबाबदारी निशा ठाकूर व कुणाल कोंढालकर यांनी पार पडली. संचालन बालकलावंत अंश रंधे यांनी केले. तब्बल पाच तास चाललेल्या या स्पर्धेत प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती.(प्रतिनिधी)