पँगोलिन तस्करीचे जाळे उद्ध्वस्त ! नागपूर DRI कडून छत्तीसगडमध्ये फिल्मी स्टाईल कारवाई; तिघांना बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 13:11 IST2026-04-13T13:10:55+5:302026-04-13T13:11:34+5:30

Nagpur : पँगोलिन तस्करीचे जाळे उद्ध्वस्त! नागपूर DRI कडून छत्तीसगडमध्ये फिल्मी स्टाईल कारवाई; तिघांना बेड्या

Pangolin smuggling network busted! Nagpur DRI conducts film style operation in Chhattisgarh; Three arrested | पँगोलिन तस्करीचे जाळे उद्ध्वस्त ! नागपूर DRI कडून छत्तीसगडमध्ये फिल्मी स्टाईल कारवाई; तिघांना बेड्या

Pangolin smuggling network busted! Nagpur DRI conducts film style operation in Chhattisgarh; Three arrested

नागपूर: वन्यजीवांच्या तस्करीविरोधात महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) नागपूर प्रादेशिक युनिटने एक मोठी मोहीम फत्ते केली आहे. छत्तीसगडमधील जगदलपूर येथे सापळा रचून डीआरआयने भारतीय खवले मांजर (पँगोलिन) च्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भांडाफोड केला. या कारवाईत तब्बल १६ किलो ५२८ ग्रॅम वजनाचे खवले जप्त करण्यात आले असून, तीन तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

​अशी झाली कारवाई

गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या नागपूर युनिटने जगदलपूर शहरात ही धडक कारवाई केली. अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून या बेकायदेशीर व्यापारात सक्रिय होते. जप्त केलेले खवले आणि अटक करण्यात आलेले आरोपी यांना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी जगदलपूर वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

​पँगोलिन: जगातील सर्वाधिक तस्करी होणारा प्राणी

कायदेशीर संरक्षण: भारतीय खवले मांजर (Manis crassicaudata) हा प्राणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची-I मध्ये येतो. याला वाघाप्रमाणेच सर्वोच्च संरक्षण प्राप्त असून, याचा व्यापार करणे गंभीर गुन्हा आहे.

​का होते तस्करी?: पँगोलिनच्या खवल्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याचा एक मोठा चुकीचा समज (Andhashraddha) आहे. तसेच लक्झरी फॅशन आणि पारंपारिक औषधांच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याला प्रचंड मागणी असल्याने तस्कर या निष्पाप प्राण्यांची शिकार करतात.

​तस्करीचे जाळे उद्ध्वस्तकरण्यात नागपूर DRI आघाडीवर

२०२५ सालापासून डीआरआय नागपूर युनिटने वन्यजीव तस्करांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. याआधीही या पथकाने अनेक राज्यांत पसरलेली मोठी जाळी उद्ध्वस्त केली आहेत.
या ताज्या कारवाईमुळे वन्यजीव तस्करांचे धाबे दणाणले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणाऱ्या या काळ्या बाजाराला नागपूर डीआरआयने मोठा दणका दिला आहे.

Web Title : छत्तीसगढ़ में पैंगोलिन तस्करी गिरोह का भंडाफोड़; तीन गिरफ्तार

Web Summary : नागपुर DRI ने छत्तीसगढ़ में पैंगोलिन तस्करी गिरोह का भंडाफोड़ किया, 16.5 किलो शल्क जब्त किए और तीन लोगों को गिरफ्तार किया। ऑपरेशन ने झूठी औषधीय मान्यताओं और लक्जरी फैशन और पारंपरिक चिकित्सा बाजारों में मांग से प्रेरित अवैध व्यापार का पर्दाफाश किया। DRI वन्यजीव तस्करी के खिलाफ आक्रामक रुख जारी रखे हुए है।

Web Title : Pangolin Smuggling Ring Busted in Chhattisgarh; Three Arrested

Web Summary : Nagpur DRI dismantled an international pangolin smuggling racket in Chhattisgarh, seizing 16.5 kg of scales and arresting three individuals. The operation exposed the illegal trade driven by false medicinal beliefs and demand in luxury fashion and traditional medicine markets. The DRI continues its aggressive stance against wildlife trafficking.