देश अगोदरपासूनच हिंदू राष्ट्र आहे, असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती विष्णू कोकजे यांनी व्यक्त केले. नागपुरात आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ...
नागपूर-मुंबई या राज्य शासनाच्या प्राधान्यक्रम असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी नागपूर व वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ९०.१५ टक्के जमीन उपलब्ध झाली आहे. ...
एकच शेतजमीन दोघांना विकून महिलेची दोन कोटीने फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोराडी पोलिसांनी या प्रकरणात कामठीतील व्यापाऱ्यासह सहा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी ११ वर्षीय साहील ऊर्फ यश नितीन बोरकर याचे अपहरण व खून करणारा क्रूरकर्मा आरोपी संतोष रामदास काळवे (२५) याला नागपूर सत्र न्यायालयाने बुधवारी फाशीची शिक्षा सुनावली. ...
गेली दोन वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर बाहेर आलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची तोफ १० जून रोजी धडाडणार आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ...
उन्हाळ्यात आंब्याची चव घेण्यासाठी सर्वच आतूर असतात. पण आंध्र प्रदेशात झालेल्या वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारी आंब्याची आवक कमी होऊन भाव वधारले आहेत. ...