महापालिकेच्या प्रभाग १२(ड)मधील पोटनिवडणुकीत महापालिकेतील सत्ताधारी भाजप व काँग्रेस यांनी प्रतिष्ठेची केली आहे. या प्रभागातून पाच उमेदवार मैदानात असले तरी, खरी लढत काँग्रेसचे पंकज शुक्ला व भाजपचे विक्रम ग्वालबन्शी यांच्यातच होण्याची शक्यता आहे. ...
शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या सदर व छावणीवरून जाणारा उड्डाणपूल आता पूर्ण झालेला आहे. २८ डिसेंबर रोजी पुलाचे काम पूर्ण होईल, असे सांगितले जात असले तरी, दोन दिवसांपूर्वीच हा वाहतुकीसाठी तयार झालेला आहे. ...
टिपेश्वर अभयारण्यातील सुमारे अडीच वर्षाचा वाघ दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून आता पुन्हा परतीच्या मार्गावर लागला आहे. त्याला बसविलेल्या कॉलर आयडीवरून वनविभाग त्याचे लोकेशन सतत मिळवित आहे. ...
देशाच्या भावी पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे ज्ञानी, पराक्रमी, संस्कारी व्यक्तिमत्त्व विकसित होण्याकरिता शिक्षकांनी माता जिजाऊ होऊन विद्यार्थ्यांना घडवावे, असे आवाहन प्रसिद्ध वक्ते डॉ. सुमंत टेकाडे यांनी केले. ...
ग्रामायण प्रतिष्ठानच्या सेवा प्रदर्शनाच्या निमित्ताने आयईटीईच्या सहकार्याने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्राम उपयोगी तंत्रज्ञान या विषयावर वर्किंग मॉडेल स्पर्धा आयोजित करण्यात आली. ...
वारंवार नोटीस बजावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाने ८३६ व्यावसायिकांचे बँक खाते गोठविले आहे. या व्यावसायिकांकडे सुमारे १०२ कोटींची थकबाकी आहे. ...
वातावरणामध्ये निर्माण झालेल्या बदलामुळे हिवाळ्याच्या दिवसात पावसाळी वातावरणाचा अनुभव येत आहे. बुधवारच्या रात्री पडलेला पाऊस सकाळपर्यंत सुरूच होता. यामुळे वातावरणात गारठा पसरला आहे. ...
नवीन एजन्सीने प्रत्येक झोनमध्ये दोन ठिकाणी कलेक्शन तयार केले आहे. जुन्या कलेक्शन सेंटरवर कचरा टाकू नये, यासाठी संबंधित एजन्सीने सतर्क असणे आवश्यक आहे. येथे कचरा आढळल्यास संबंधित एजन्सीला जबाबदार धरून कारवाई केली जाणार आहे. ...