जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूने नागपुरातही शिरकाव केला आहे. नागपुरातील सात संशयित रुग्णांपैकी एकजण पॉझिटिव्ह आढळून आल्याने नागपुरातच नाही तर राज्यभरात खळबळ उडाली आहे. ...
कोरोना विषाणूचा वाढता प्रकोप लक्षात घेता नागपुरातील जिल्हा प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यासाठी विशेष समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. ...
होळीच्या दिवसात अपघात अन् गुन्हे हमखास घडत असतात. परंतु ही होळी यादृष्टीने चांगली गेली. पोलिसांच्या ‘फुलप्रूफ’ बंदोबस्त व नियोजनामुळे गुन्हेगार व असामाजिक तत्त्वांना सक्रिय होण्याची संधीच मिळाली नाही. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांना दिलासा देणारा प्रस्ताव विधीसभेने संमत केला आहे. विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षेचे वेळापत्रक व निकालांची सूचना थेट मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’च्या माध्यमातून मिळणार आहे. ...
नागपूरकरांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी असलेल्या धुळवडीची मजा घेतली. सकाळपासूनच रस्तोरस्ती, घरोघरी गुलाल उधळण्याचा आणि एकमेकांना रंग लावून परंपरेचा जल्लोष संबंध नागपुरात सुरू होता. ...
यावर्षी होळीत नागपुरात ठोक बाजारात भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांची जवळपास पाच कोटींची विक्री झाली. यंदा लोकांनी भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांनी रंगोत्सव साजरा केला. ...
रंगाच्या वापरामुळे त्वचेला पोहचणारी हानी, डोळ्यांना होणारी इजा, शरीरावरील जखमांवर होणारा परिणाम असे अनेक दुष्परिणाम आहेत. मात्र नैसर्गिक रंगांचा वापर केला तर संभाव्य हानींवर मात करून रंगोत्सवाचा आनंद अधिक वाढविता येणार आहे. ...
अनियंत्रित रक्तदाब व मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा सर्वाधिक धोका असतो. परंतु हे दोन आजार नसतानाही दक्षिण-पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यात मूत्रपिंड निकामी रुग्ण, विशेषत: सातपुड्याच्या डोंगरदऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या-छोट्या गावांमध्ये ...