भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांनी रंगोत्सव : नागपुरात पाच कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 08:10 PM2020-03-11T20:10:40+5:302020-03-11T20:14:01+5:30

यावर्षी होळीत नागपुरात ठोक बाजारात भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांची जवळपास पाच कोटींची विक्री झाली. यंदा लोकांनी भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांनी रंगोत्सव साजरा केला.

Rangostava with Indian-made colour pipe , turnover Rs 5 crore in Nagpur | भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांनी रंगोत्सव : नागपुरात पाच कोटींची उलाढाल

भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांनी रंगोत्सव : नागपुरात पाच कोटींची उलाढाल

Next
ठळक मुद्दे चीनमधून आयात बंद

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी चीनची खेळणी आणि पिचकाऱ्यांवर जास्त अबकारी शुल्क आकारल्याने आयात कमी झाली आहे. शिवाय यावर्षी कोरोना विषाणूमुळे आयात जवळपास बंद झाली. त्यामुळे भारतात या उद्योगात पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. यावर्षी होळीत नागपुरात ठोक बाजारात भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांची जवळपास पाच कोटींची विक्री झाली. यंदा लोकांनी भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांनी रंगोत्सव साजरा केला.
केंद्र सरकारने कस्टम पॉलिसी लागू करण्याआधी देशातील बाजारपेठांमध्ये भारतीय बनावटीच्या ४० टक्के आणि ६० टक्के चिनी खेळणी आणि पिचकाऱ्यांची विक्री व्हायची. पण गेल्या वर्षीपर्यंत भारतीय बनावटीच्या मालांनी ७० टक्के बाजारपेठ काबीज केली. यावर्षी ९५ टक्के भारतीय मालाची विक्री झाली. तीन महिन्यांपूर्वी काही विक्रेत्यांनी चीनमधून मागविलेल्या ५ टक्के पिचकाऱ्यांची विक्री झाल्याची माहिती इतवारी जनरल मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अशोक सिंघवी यांनी दिली.
दरवर्षी नवीन पिचकारी खरेदीची भारतीय लोकांची मानसिकता असल्याने यंदाही लोकांनी उत्साहात खरेदी केली. जास्त किमतीच्या कॅप्सूल आणि टॅन्कला जास्त मागणी होती. सिंघवी म्हणाले, भारतीय बनावटीची खेळणी आणि पिचकाऱ्यांची मागणी देशांतर्गत वाढल्याने दिल्ली, गुडगाव, मुंबई येथील उत्पादकांनी मालाच्या दर्जात सुधारणा केली. स्पर्धा होऊ लागल्याने चिनी मालाच्या किमतीतच भारतीय माल ग्राहकांना मिळू लागला. केंद्र सरकारच्या धोरणामुळे चीनमधून या मालाची आयात करणे कठीण झाले. त्यामुळे देशांतर्गत उद्योग वाढले असून, रोजगारातही वाढ झाली आहे.
रिटेल व्यवसायावर थोडा फार परिणाम
यावर्षी कोरोना व्हायरसचा परिणाम ठोक व्यवसायाऐवजी रिटेल व्यवसायावर झाला. होळीचा व्यवसाय दोन महिन्यांपूर्वी सुरू होतो. ठोक विक्रेते होळीसाठी लागणाऱ्या वस्तूंचा संग्रह करतात. अनेकांनी दोन महिन्यांपूर्वीच पिचकाऱ्या आणि अन्य वस्तू मागविणे सुरू केले. त्यानुसार रिटेल व्यावसायिकांनीही होळीच्या १५ दिवसांपूर्वी मालाची खरेदी केली. पण दोन-चार दिवसांपूर्वी होळी सण एकत्रितरीत्या साजरा करण्यावर निर्बंध आल्याने रिटेलमधून पिचकाऱ्यांची विक्री कमी झाली. त्याचा परिणाम होळीच्या व्यवसायावर झाल्याचे सिंघवी म्हणाले.

Web Title: Rangostava with Indian-made colour pipe , turnover Rs 5 crore in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.