गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व पुनर्बांधणीच्या महापालिकेच्या ३१.१५ कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यातील पहिल्या टप्प्यात सौंदर्यीकरणावर १८ कोटींचा खर्च केला जाणार आहे. ...
बैलगाडी शर्यतींना परवानगी का नाकारली जाते, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला केली व यावर आठ आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला. ...
जिल्हा परिषदेसोबत जिल्ह्यातील १३ पंचायत समितीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. त्यात एकूण ११६ जागांपैकी सर्वाधिक ५९ जागा मिळवित पहिली पसंती काँग्रेसला मिळाली. ...
कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा परिणाम नागपुरातही जाणवला. नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासह एकूणच शासकीय कार्यालये आयुर्विमा महामंडळ आणि बँका ओस पडल्या होत्या. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व मिलिंद जाधव हे १ फेब्रुवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील समस्या जाणून घेणार आहेत. ...
विकासाच्या प्रवाहात विरोधकांनादेखील सोबत घेण्यात येईल, असे मत राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले. पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आपली भावना मांडली. ...
नागपूर सुधार प्रन्यासने उत्तर अंबाझरी मार्गावरील नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाच्या जमिनीचा लीज करार रद्द केला आहे. यासंदर्भात ३ जानेवारी रोजी आदेश जारी करण्यात आला आहे. ...
केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्त्व सुधारणा कायदा (सीएए) तसेच राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) व एनपीआर विरोधात बुधवारी नागपुरात विशाल रॅली काढण्यात आली. ...
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे. जिल्ह्यातील ५८ जि.प. सर्कलपैकी ४० जागांवर आघाडीने दणदणीत विजय मिळविला आहे. ...