नागपुरात  रिकामटेकडे फिरणाऱ्यांना दंडुका अन् उठाबशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 08:24 PM2020-03-24T20:24:56+5:302020-03-24T20:27:23+5:30

‘कोरोना’शी लढा देण्यासाठी नागरिकांनी घरात राहणे अत्यावश्यक आहे. यासाठी राज्य शासनातर्फे संचारबंदी लागू करण्यात आली. नागरिकांकडून याला चांगला प्रतिसाददेखील मिळाला. परंतु सकाळच्या वेळी काही अतिहुशार घराबाहेर निघाले होते.

Danduka and Uthabasha for those who move to idle in Nagpur | नागपुरात  रिकामटेकडे फिरणाऱ्यांना दंडुका अन् उठाबशा

नागपुरात  रिकामटेकडे फिरणाऱ्यांना दंडुका अन् उठाबशा

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूरकरांनो, काही दिवस संयम राखा : घरी राहून करा देशसेवा : अतिहुशार महाभागांचा पोलिसांनी घेतला ‘क्लास’

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’शी लढा देण्यासाठी नागरिकांनी घरात राहणे अत्यावश्यक आहे. यासाठी राज्य शासनातर्फे संचारबंदी लागू करण्यात आली. नागरिकांकडून याला चांगला प्रतिसाददेखील मिळाला. परंतु सकाळच्या वेळी काही अतिहुशार घराबाहेर निघाले होते. चौकामध्ये गेल्यावर त्यांची भेट थेट पोलिसांच्या लाठीशीच झाली अन् त्यानंतर मिळालेल्या ‘छडी’च्या ‘छमछम’मुळे इतरही महाभाग आपसूकच सरळ झाले. दुपारनंतर शहरातील बहुतांश रस्ते निर्मनुष्य होते.


सकाळच्या सुमारास दूध व इतर साहित्य आणण्यासाठी लोक दुकानांकडे गेले होते. त्यानंतर काही जणांनी नाश्ता किंवा चहाच्या शोधात काही दूरपर्यंत धाव घेतली. त्यांच्या स्वागताला पोलीस उपस्थित होतेच अन् समाधानकारक कारण न दिल्यास कारवाई होताना दिसून आली. दुपारनंतर पोलिसांनी ‘छडी’ म्यान केली व त्यानंतर नियमांचा भंग करणाऱ्यांना भर चौकात उठाबशा काढायला लावल्या.
दरम्यान, अत्यावश्यक सेवा सोडून व काही अपवाद सोडून मंगळवारी नागरिकांनी घरी राहणेच पसंत केले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद होते. एरवी गर्दीने ओसंडून वाहणाºया चौकांमध्ये चिटपाखरूदेखील नव्हते. शहरभरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता व वस्त्यावस्त्यांमध्ये त्यांची गस्त दिसून आली.
रेल्वेगाड्या रद्द केल्या असल्यामुळे मुख्य रेल्वेस्थानकासह अजनी व इतवारी स्थानकांवरदेखील प्रवासी नव्हते. मध्यवर्ती बसस्थानक, कॉटन मार्केट, सीताबर्डी मार्केट येथेदेखील सामसूम होती.
गल्लीबोळांत फिरले पोलीस
धरमपेठ, सीताबर्डी, प्रतापनगर, त्रिमूर्तीनगर, लक्ष्मीनगर, रामदासपेठ, धंतोली, हसनबाग, सक्करदरा, मानेवाडा, मनीषनगर, वर्धा मार्ग, गिट्टीखदान, झिंगाबाई टाकळी, सदर, इतवारी, महाल, रविनगर, वर्धमाननगर, दिघोरी, पारडी, उमरेड मार्ग, नंदनवन, मेडिकल चौक, रेशीमबाग यासह सर्वच ठिकाणी पूर्णत: शांतता होती. मात्र काही भागांतील अंतर्गत भागात नागरिक घराबाहेर निघाले होते. अशा ठिकाणी पोलीस फिरले व ‘लाऊडस्पीकर’वर घोषणा करून त्यांना बाहेर न पडण्यास सांगितले.
शिकलेले ‘अशिक्षित’ कधी सुधारणार?
दक्षिण-पश्चिम नागपूर ही प्रामुख्याने पांढरपेशांची वस्ती मानली जाते. मात्र या भागातील गोपालनगर, प्रतापनगर, रिंगरोड, देवनगर, लक्ष्मीनगर यासारख्या भागात काही अतिहुशार लोक बाहेर निघालेले दिसून आले. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला असतानादेखील हे लोक भटकत होते. अशा शिकल्या सवरल्या ‘अशिक्षित’ लोकांवर कठोर कारवाईची आवश्यकता आहे.

Web Title: Danduka and Uthabasha for those who move to idle in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.