कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळमना येथील कृृषी उत्पन्न बाजार समितीतील सहाही बाजारपेठा बंद करण्याचे शासनाकडून कोणतेही आदेश नाहीत. या सर्व बाजारपेठा जीवनावश्यक वस्तू अंतर्गत येत असल्याने बंद करता येत नाहीत, अशी माहिती समितीचे प्रशासक सचिव राजेश भुसारी यांन ...
आंध्र प्रदेशातून माल घेऊन नागपुरात पोहचलेला मालवाहू ट्रक रेडिसन चौकात मंगळवारी बंद पडला. या अनोळखी शहरात सारेच बंद असल्याने भुकेने व्याकूळ झालेला ट्रकचालक ढसाढसा रडला. ...
कोरोना वायरसच्या संक्रमणावर ताबा मिळविण्यासाठी सरकारने लॉकडाऊन सुरू केले आहे. यामुळे वाहतूक प्रभावित झाल्याने सुमारे ३ टन मासे खराब होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे मत्स्य व्यावसायिकांमध्ये चिंता पसरली आहे. ...
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी घरपोच अन्न सेवा पुरविणाऱ्या १२०० डिलिव्हरी बॉईजच्या आरोग्य तपासणीला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ३०० वर बॉईजची तपासणी करण्यात आली. ...
‘लॉकडाऊन’ दरम्यान काही ठिकाणी पोलिसांनी विनाकारण बळाचा वापर केला. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ठाणेदारांना फटकारले. ...
केरळ येथून आलेला शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील (डेन्टल) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाबाबतची लक्षणे आढळून आल्याने, मंगळवारी मेयोत तपासणी करण्यात आली. ...
कॉर्पोरेट कंपन्या, शासकीय कर्मचारी, शिक्षक आणि इंटरनेटद्वारे होणारी कामे असे सर्व कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजेच घरी बसून काम करीत आहेत. पण हे काम करीत असताना इंटरनेटचा फटका कामाला बसतो आहे. इंटरनेटची स्पीड स्लो असल्यामुळे कामावर परिणाम होत आहे. ...
तीन आठवड्यात ४५१ संशयित रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. बुधवारी पुन्हा ३६ नमुन्यात एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
नागपूर शहरातील बाजार, रस्ते व चौकात स्वच्छता दिसत असून कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले असून आता दररोज ७०० मेट्रिक टन कचरा संकलित होत आहे. म्हणजेच ४५० मेट्रिक टन कचरा कमी निघत आहे. ...