कोरोनाला नष्ट करण्यासाठी देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मदतीसाठी वकिलांच्या संघटनांनी गुरुवारी एकाच दिवशी १४ लाख रुपयावर रक्कम गोळा केली. ...
रेल्वे वाहतूक बंद झाल्यामुळे रेल्वेचे ७ कर्मचारी मुंबईला तर ४० कर्मचारी नवी दिल्ली येथे अडकून पडले होते. दरम्यान हे कर्मचारी गुरुवारी केरळ एक्स्प्रे्रेस आणि थिरुकुरल एक्स्प्रेसने आपापल्या गावाकडे निघून गेले. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक वस्तू आणि वीज पुरवठ्यासाठी कोळसा कमी पडू नये यासाठी मध्य रेल्वे अथक परिश्रम घेत आहे. ...
मुलीची परीक्षा सुरू असतानाच कुटुंबातील अचानक आलेल्या प्रसंगामुळे मुलीला सोडून आईवडिलांना आपल्या गावी जावे लागले. नेमके याचवेळी कोरोना विषाणूच्या उद्रेकाने देशातील शहरे लॉकडाऊन झाली. ...
सध्या आवश्यक सर्जिकल मास्क आणि हॅण्ड सॅनिटायझरवरील जीएसटी एक वर्षासाठी रद्द करून, ग्राहकांना फायदा देण्याची मागणी चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री ऑफ ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल केंद्रीय वित्तमंत्र्यांकडे केली आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात आपल्या घरात बंदिस्त झालेले ज्येष्ठ नागरिक आणि गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी डाक विभाग समोर आला आहे. यापुढे पोस्टमन या गरजवंतांना ५००० रुपयापर्यंतची रक्कम घरी पोहचवतील. ...
उपचारानंतर किंवा शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून सुटी झाली खरी, परंतु ‘लॉकडाऊन’मुळे ऑटोरिक्षापासून ते बससेवा बंद असल्याने घरी जायचे कसे, हा प्रश्न रुग्णांना पडला आहे. यातील सात रुग्ण बुधवारपासून रुग्णालयाच्या आवारातच थांबून होते. ...
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये नेमकी माहिती जाणे आवश्यक आहे. त्यामुळेच शुक्रवारपासून शहरात वृत्तपत्रांचे वितरण सुरू होणार आहे. यासंदर्भात विदर्भ डेली न्यूज पेपर असोसिएशन व हॉकर्सची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. ...
कोरोना संशयित वा बाधित लोकांच्या संपर्कात कुणी आले का, याची शहानिशा करण्यासाठी संपूर्ण नागपूर शहरातील २७ ते ३० लाख लोकांच्या सर्व्हेक्षणाला गुरुवारी सुरुवात करण्यात आली. महापालिकेच्या ३८ प्रभागात हा सर्व्हे केला जात आहे. ...
‘कोरोना’संदर्भात राज्यभरात केंद्र सरकारच्या सूचनांचे कशा पद्धतीने पालन होत आहे याचा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीगुरुवारी आढावा घेतला. ...