नागपूर महानगरपालिकेने आणि जिल्हा प्रशासनाने बेघरांसाठी आणि भिकारी व मनोरुग्णांसाठी तात्पुरते निवारे उभारले असले तरी अनेक बेघर आणि मनोरुग्ण आजही रस्त्यावरच असल्याचे चित्र शहरात आहे. ...
‘कोरोना‘च्या नियंत्रणासाठी नागपुरदेखील ‘लॉकडाऊन’ झाले आहे. मनुष्यांसमवेत जनावरांनादेखील याचा फटका बसतो आहे. शहरातील भटके कुत्रे आक्रमक होत असून रात्री घोळक्याने फिरत असताना अचानक एखादी गाडी समोर आली तर धावून जाण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. ...
कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबविण्यासाठी लॉनडाऊनच्या घोषणेनंतर बांधकाम क्षेत्रातील जुन्या प्रकल्पांचे बांधकाम ठप्प आहे. कच्च्या मालाची आवक बंद झाली आहे. ...
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू वगळता बाकी व्यवसाय ठप्प पडले असले तरी सिगारेट, खर्रा, तंबाखूची विक्री मात्र थांबलेली नाही. पोलिसांची गस्त वाढल्याने खुलेआम विक्रीवर आळा बसला असला तरी गुपचूप डिलिव्हरीद्वारे ग्राहकांना त्यांचा माल सहज उपलब्ध होत ...
मोबाईलमुळे सर्व जग एका छोट्याशा चौकटीत तर आलेच आहे, सोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या या काळात मनोरंजनाची सर्व साधने रद्द असल्याने मोबाईल हाच एक मोठा विरंगुळा ठरत आहे. ...
कोरोना विषाणू संशयित रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल लवकर मिळण्यासाठी मेडिकल व ‘एम्स’मध्ये ‘पॉलिमर चेन रिअॅक्शन’ (पीसीआर) यंत्र उपलब्ध झाले आहे. कोरोनाची किट व ‘एनआयव्ही’कडून हिरवी झेंडी मिळाल्यास या आठवड्यात या दोन्ही रुग्णालयांच्या प्रयोगशाळेत कोरोना ...
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन‘मुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक कामगारांना फटका बसला आहे. अशा कामगारांसह बेघर झालेल्या १३ हजार ५६३ नागरिकांची १४१ निवारागृहे (शेल्टर होम) व्यवस्था करण्यात आली आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करतानाच नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवनावश्यक वस्तुंच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. ...
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे मजूर बेरोजगार झाले असून ते आपापल्या कुटुंबीयांसह घरी जाण्यासाठी घोळक्याने रोडवर निघाले आहेत. परिणामी, कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती आहे. त्यांच्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा व औषधोपचाराची सोय करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र ...