एक एप्रिलनंतरही बिले स्वीकारणार; सरकारचे प्रतिज्ञापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 02:53 AM2020-03-31T02:53:02+5:302020-03-31T02:53:08+5:30

अंतिम तारखेचे परिपत्रक अडथळा नाही

 Will accept bills after April 1; Government Affidavit | एक एप्रिलनंतरही बिले स्वीकारणार; सरकारचे प्रतिज्ञापत्र

एक एप्रिलनंतरही बिले स्वीकारणार; सरकारचे प्रतिज्ञापत्र

Next

नागपूर : सरकारी विभागांनी २०१९-२० या वर्षात केलेल्या खर्चाची बिले १ एप्रिलनंतरही स्वीकारले जातील. अंतिम तारखेचे परिपत्रक यात अडथळा ठरणार नाही अशी ग्वाही राज्य सरकारने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाला दिली. त्यामुळे सरकारी विभागांना मोठा दिलासा मिळाला. यासंदर्भात लेखा व कोषागार विभाग नागपूरचे सहसंचालक विजय कोल्हे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले.

प्रकरणावर न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उच्च न्यायालयात सी. एच. शर्मा व इतरांची सरकारी रुग्णालयांच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यात हा मुद्दा हाताळण्यात आला. वित्त विभागाचे प्रधान सचिव (लेखा व कोषागार) यांच्या आदेशानुसार लेखा व कोषागार विभागाचे संचालकांनी २४ मार्च रोजी वादग्रस्त परिपत्रक जारी करून जिल्हा कोषागारे व उप-कोषागारे आणि अधिदान व लेखा कार्यालये येथे २०१९-२० मधील खर्चाची बिले सादर करण्यासाठी २७ मार्च ही अंतिम तारीख ठरवली होती. या तारखेनंतर केवळ कोरोना आजाराशी निगडित देयके स्वीकारण्याची मुभा देण्यात आली होती. कोरोनामुळे कर्मचारी कमी करण्यात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले होते.

गेल्या २६ मार्च रोजी न्यायालयाने यावरून राज्य सरकारला फटकारले होते. त्यामुळे वादग्रस्त निर्णयावर पुनर्विचार करून सोयिस्कर अंतिम तारीख ठरविण्यात यावी असा आदेश लेखा व कोषागार विभागाचे संचालक आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव (लेखा व कोषागार) यांना देण्यात आला होता. त्यानुसार या विभागाने वादग्रस्त परिपत्रकात सुधारणा केली आहे. या प्रकरणावर ८ एप्रिल रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.

Web Title:  Will accept bills after April 1; Government Affidavit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.