CoronaVirus in Nagpur : बांधकाम व्यावसायिकांना कोट्यवधींचा फटका : सर्व प्रकल्प बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 01:10 AM2020-03-31T01:10:31+5:302020-03-31T01:12:06+5:30

कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबविण्यासाठी लॉनडाऊनच्या घोषणेनंतर बांधकाम क्षेत्रातील जुन्या प्रकल्पांचे बांधकाम ठप्प आहे. कच्च्या मालाची आवक बंद झाली आहे.

CoronaVirus in Nagpur: Billions hit by builders: all projects shut down | CoronaVirus in Nagpur : बांधकाम व्यावसायिकांना कोट्यवधींचा फटका : सर्व प्रकल्प बंद

CoronaVirus in Nagpur : बांधकाम व्यावसायिकांना कोट्यवधींचा फटका : सर्व प्रकल्प बंद

Next
ठळक मुद्दे अन्य राज्यांतून कामगारांना बोलविण्याची समस्या

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबविण्यासाठी लॉनडाऊनच्या घोषणेनंतर बांधकाम क्षेत्रातील जुन्या प्रकल्पांचे बांधकाम ठप्प आहे. कच्च्या मालाची आवक बंद झाली आहे. काही कामगार कामावर असून बिल्डर्स काळजी घेत आहेत. तर अन्य राज्यातील बहुतांश कामगार स्वगृही परतले आहेत. बांधकाम क्षेत्रावर आधारित अन्य व्यवसायही पूर्णपणे ठप्प झाले आहेत. त्यामुळे नागपुरात लॉकडाऊननंतर ५०० कोटींचा व्यवसाय अडचणीत आला आहे.
गुढीपाडव्याला जवळपास ३०० कोटींचा व्यवसाय होतो. पण यावेळी एकाही फ्लॅटची विक्री न झाल्याने बिल्डर्स चिंतित आहेत. बांधकाम व्यवसायामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे कामगार. नागपुरात बांधकाम क्षेत्रात अन्य राज्यांतील कामगारांची संख्या मोठी आहे. कोरोना व्हायरसमुळे कामगार लॉकडाऊनपूर्वीच आपल्या गावाकडे परतले. याशिवाय कंत्राटदारांनीही काम बंद केले आहे. नागपुरात १५० पेक्षा जास्त प्रकल्पांचे काम सुरू होते. पण आता सर्वच प्रकल्पांचे बांधकाम ठप्प आहे. बांधकाम केव्हा सुरू होणार याची गॅरंटी नाही. समजा सुरूही झाल्यास सुरळीत होण्यास तीन ते चार महिने लागणार आहे. नागपुरात जवळपास लहानमोठे तीन हजारांपेक्षा जास्त बिल्डर्स आहेत. सर्वांचे काम बंद झाले आहे.
रेरातर्फे तीन महिन्याची मुदत
‘रेरा’ अंतर्गत बांधकाम व्यावसायिकांना तीन महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे. ही मुदत सहा महिन्यांची असावी. याशिवाय बँकांनाही सहा महिन्यांची मुदत द्यावी. त्यानंतरच बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन मिळणार आहे. तसे पाहता दिवाळीपासून गुढीपाडव्यापर्यंत घरांना मागणी असते. यावर्षी गुढीपाडव्याला नवीन प्रकल्प दाखल झालेले नाहीत.
क्रेडाई नागपूर मेट्रोचे अध्यक्ष महेश साधवानी म्हणाले, अनेक प्रकल्पांचे बांधकाम बंद आहे. परराज्यातील कामगार स्वगृही परतले आहेत. ते केव्हा येतील, त्याची गॅरंटी नाही. त्यांना आणावे लागेल. बंद झालेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील. प्रारंभी देशप्रेम महत्त्वाचे आहे. पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाला आमचे समर्थन आहे. कोरोना पळविण्याची आमची सर्वांची जबाबदारी आहे. प्रकल्पाचे बांधकाम पुढेही सुरू होईल.
क्रेडाई महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष प्रशांत सरोदे म्हणाले, अनेक प्रकल्पांचे काम थांबले आहे. गुढीपाडव्याला नवीन प्रकल्पाचे काम सुरू झाले नाहीत. शिवाय जुन्याही प्रकल्पांचे काम बंद आहे. यावेळी ३०० फ्लॅट बुकिंगची अपेक्षा होती. पण बुकिंग होऊ शकले नाही. अन्य राज्यातील कामगार घरी परतले आहेत. संकट मोठे आहे. काम पुन्हा सुरू होण्यास वेळ लागणार आहे. पण आधी संकट कोरोनाचे आहे. रेराने तीन महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे.
क्रेडाई नागपूर मेट्रोचे सचिव गौरव अगरवाला म्हणाले, कोरोनाचे संकट दूर होऊन पुन्हा नव्याने बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू होईल. अनेक कामगार प्रकल्पावर थांबले आहेत. बिल्डर्स त्यांची काळजी घेत आहेत. परराज्यातील कामगार घरी गेले आहेत. कोरोनामुळे बांधकाम क्षेत्राला कोट्यवधींचा फटका बसला आहे. बिल्डर्सना झालेले आर्थिक नुकसान पुढे भरून निघणार आहे. पण कोरोना देशातून दूर करण्याची आमची सर्वांची जबाबदारी आहे.

Web Title: CoronaVirus in Nagpur: Billions hit by builders: all projects shut down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.