मध्य प्रदेशातून मोठा मद्यसाठा घेऊन नागपुरात येणाऱ्या ट्रक आणि आर्टिगा कारला बेलतरोडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री सिनेस्टाईल ताब्यात घेतले. ट्रक आणि कारमधून साडेसात लाख रुपयांचे वेगवेगळ्या प्रकारचे मद्य पोलिसांनी जप्त केले. ...
लॉकडाऊनचे कारण पुढे करून शाळेतील कार्यरत शिक्षकांना वेतन देण्यात चालढकल करणाऱ्या विनाअनुदानित शाळांच्या संचालकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. यासंदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत. ...
दोन दिवसात १२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शुक्रवारी सहा तर आज शनिवारी आणखी सहा रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांसह नागपुरात एकूण रुग्णांची संख्या १५० वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, १४ महिन्यांच्या जुळ्या बाळापैकी एका बाळाचे नमुने पॉझिटिव्ह आले. ...
कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये राज्यात आणि राज्याबाहेर अडकलेल्या मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि अन्य व्यक्तींसाठी केंद्र शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार नागपूर महापालिकेनेही त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. या आवाहन ...
नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढीसाठी काही ‘हॉटस्पॉट’ कारणीभूत ठरले आहेत. शहरातून कोरोना हद्दपार करण्यासाठी आता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. ...
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या समर्थकांनी महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून पाळला. लॉकडाऊनमुळे विदर्भवाद्यांनी आपापल्या घरांवर विदर्भाचा झेंडा फडकवून स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरली. ...
वैद्यकीय पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेस पात्र असलेले विद्यार्थी जे रुग्णांना सेवा देण्यास इच्छुक नसतील अशा विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण विभागाने सर्व अधिष्ठात् ...
कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर शहरातील नागरिकांत भीतीचे वातावण आहे. त्यातच रात्रीच्या सुमारास मोकाट कुत्री अधिक आक्रमक दिसत आहे. यामुळे कुत्री व जनावरांना कोरोनाचा संसर्ग तर झाला नाही ना? अशी शंका काही लो ...