हॉटस्पॉट कोरोनामुक्त करण्यासाठी मास्टर प्लॅन : मनपा आयुक्तांची संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 08:41 PM2020-05-02T20:41:59+5:302020-05-02T20:42:52+5:30

नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढीसाठी काही ‘हॉटस्पॉट’ कारणीभूत ठरले आहेत. शहरातून कोरोना हद्दपार करण्यासाठी आता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला आहे.

Master Plan for Freeing Hotspot Corona: Concept of Municipal Commissioner | हॉटस्पॉट कोरोनामुक्त करण्यासाठी मास्टर प्लॅन : मनपा आयुक्तांची संकल्पना

हॉटस्पॉट कोरोनामुक्त करण्यासाठी मास्टर प्लॅन : मनपा आयुक्तांची संकल्पना

Next
ठळक मुद्देबाधिताच्या संपर्कात येणाऱ्यांना क्वारंटाईन करणार


लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढीसाठी काही ‘हॉटस्पॉट’ कारणीभूत ठरले आहेत. शहरातून कोरोना हद्दपार करण्यासाठी आता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. त्यानुसार ‘हॉटस्पॉट’मधील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात येणाºया लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. या सर्वांचे कोरोना ‘स्वॅब’ घेतले जात आहेत. मास्टर प्लॅननुसार कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या सतरंजीपुरा भागात कार्य सुरू झाले आहे. आतापर्यंत सतरंजीपुरा भागातील १७०० पेक्षा जास्त जणांना क्वारंटाईन करून मनपाच्या ‘कोविड केअर सेंटर’मध्ये आणण्यात आले आहे.
सध्या शहरात कोरोनाचे १३४ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापैकी बहुतांश रुग्ण हे सतरंजीपुरा भागातीलच आहेत. त्यामुळे या भागातील कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न मनपातर्फे केले जात आहेत. सतरंजीपुरा परिसरात एका कोरोनाबाधित व्यक्तीमुळे कोरोनाच्या संसर्गाची मोठी साखळी निर्माण झाली. ही साखळी खंडित करण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्ण राहत असलेल्या परिसरातील २८० घरांमधील १७०० पेक्षा जास्त लोकांना ‘क्वारंटाईन’ करून त्यांना ‘कोविड केअर सेंटर’मध्ये दाखल करण्यात आले आहे. या सर्वांचे ‘स्वॅब’ घेण्याचे काम सुरू आहे. ‘स्वॅब’ पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णावर जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचारही सुरू आहेत.

४० रुग्ण पूर्णपणे बरे झाले
शहरात आतापर्यंत १४५ कोविड-१९ पॉझिटिव्ह रुण आढळले असून यापैकी ४० रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत शहरात सुमारे ९६ ‘अ‍ॅक्टिव्ह’ केसेस असून त्यापैकी ८८ रुग्ण फक्त सतरंजीपुरा परिसरातील आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मनपातर्फे अहोरात्र काम सुरू आहे. नागरिकांनीही कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त मुंढे यांनी केले आहे.

Web Title: Master Plan for Freeing Hotspot Corona: Concept of Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.