जिल्हा सहनिबंधक कार्यालयातर्फे स्थावर मालमत्ता खरेदी विक्री पूर्ववत सुरू करण्यात आली असून, मुद्रांक शुल्कविषयक ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. ...
लॉकडाऊनमुळे करवसुली ठप्प असल्याने याचा जबर फटका महापालिकेच्या उत्पन्नाला बसणार आहे. याचा विचार करतात प्रशासनाने पाणीपट्टी वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. पुढील आर्थिक वर्षात मनपा आयुक्तांच्या अर्थसंकल्पात २६० कोटींची वाढ अपेक्षित आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा टंचाईची कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, अद्याप ग्राम पातळीवर कामासंदर्भातील करारनाम्याचे काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
दम्याचा व दम्याचा पूर्व इतिहास असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे या काळात अधिक काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे नागपुरातील नामवंत श्वसनरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...
कोरोनाबाधित मृतदेहाची विल्हेवाट दहन प्रक्रियेने केल्यास संसर्गाचे सर्व स्त्रोत जळून नष्ट होतात. परंतु कुठल्या धर्माला दहन करण्यास आपत्ती असल्यास मृतदेहाचे योग्य काळजीपूर्वक दफन करणे आवश्यक आहे. दफन करतेवेळेस खड्डा कमीत कमी सात-आठ फूट खोल असावा. ...
लॉकडाऊनदरम्यान मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने विशेष पार्सल रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून २ हजार टन पार्सलची वाहतूक केली आहे. पार्सल रेल्वेगाड्यांना प्रतिसाद मिळावा यासाठी नागपूर विभागाने विविध औद्योगिक संस्था, व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांना मालवाह ...
विदर्भात दरवर्षी मार्च महिन्यापासून तापणारा उन्हाळा यंदा दोन महिने विलंबाने अवतरला आहे. असे असले तरी मे महिन्याची सुरुवातच कडक उन्हाने झाली आहे. रविवारी अकोलामध्ये सर्वाधिक म्हणजे ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ...
आईवडिलांचे पिंडदान करण्यासाठी ते रामेश्वरमला गेले होते. तेथून २० मार्च रोजी कन्याकुमारीला गेले. २३ मार्चला परतीचा प्रवास होता. परंतु लॉकडाऊनमुळे रेल्वेगाडी रद्द झाली. त्यांना तिकिटाचे पैसे तर परत मिळाले, मात्र कन्याकुमारी स्थानकावर दुर्दैव आडवे आले. ...
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य शासनाच्या सुचनेनंतर रविवारी सायंकाळी ७.३० वाजता नागपूरवरून लखनऊसाठी २४ कोचची श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी सोडण्यात आली. ...