तप्त उन्हाळा वीटभट्टीसाठी सुगीचा असतो. कारण याच तापाने ओल्या विटा पक्क्या होऊन घर बांधणीस उपयुक्त होतात; मात्र यावर्षी असे नाही. सूर्य तापतो आहे पण वीटभट्ट्यांचे काम थंड पडले आहे. ...
चौकीदाराचे हात बांधून तुकडोजी चौकाजवळच्या एका वाईन शॉपचे शटर तोडून सशस्त्र चोरट्यांनी आतमधील मद्य लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र काऊंटर समोरच्या मजबूत लोखंडी गेटचे कुलूप तोडण्यात त्यांना यश आले नाही. ...
गेल्या ४०-४५ दिवसांपासून सुरू असलेल्या कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे तब्बल १४ कोटी व्यक्ती बेरोजगार झाल्या असल्याचा धक्कादायक निष्कर्ष ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने (सीएमआयई) ताज्या अहवालात काढला आहे. ...
विदर्भात रविवारी दिवसभरात २४ नव्या कोरोनाबाधितरुग्णांची नोंद झाली. यात अकोल्यात पुन्हा नऊ रुग्ण आढळून आले. शिवाय, अमरावतीत पाच, नागपुरात ९ तर यवतमाळमध्ये एक रुग्णाची नोंद झाली आहे. विदर्भातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता ४०० चा टप्पा ओलांडला आहे. ...
लॉकडाऊनदरम्यान काही भागांना सवलत देण्यात आली असली तरी संपूर्ण नागपुरात दारू बंदच राहणार आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीच नागपूर शहरात दारूबंदी राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता जिल्हधिकारी रवींद्र ठाकरे यांनीसुद्धा संपूर्ण नागपूर जिल ...
‘कोरोना’च्या संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका निश्चित बसला आहे. परंतु आज संपूर्ण जग चीनवर नाराज आहे. त्यामुळे तेथील कंपन्या आपल्याकडे येण्यासाठी प्रयत्न करून आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर करावे लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयात कमी करून ...
कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये नागपुरात सतरंजीपुरापाठोपाठ हॉटस्पॉट ठरलेल्या मोमिनपुरा व डोबीनगर परिसरात संसर्गाला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनाने या परिसरातील ३५० नागरिकांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारी डोबीनगर परिसरातील १० ...
नागपूर शहरात जीवनावश्यक वस्तूंसह निवासी संकुलातील आणि रहिवासी परिसरातील फक्त होजियरी आणि स्टेशनरी दुकाने, इन सीटू बांधकाम कार्य आणि १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यालये सुरू करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी घेतला ...
कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे मनपाची मार्च महिन्यातील सभा रद्द करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यातही बैठकींना पूर्णविराम मिळाला. आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्थायी समितीची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
सोशल मीडियाच्या असुरक्षित वापरामुळे व्हॉट्सअॅप आणि फेसबुक ‘हॅक’ होण्याचे गुन्हे वाढल्याचे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी जनतेला खबरदारीचे आवाहन केले आहे. ...