Masks are also mandatory in public places in rural Nagpur | नागपूर ग्रामीण भागातही सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक

नागपूर ग्रामीण भागातही सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर ग्रामीण भाग हा रेड झोनमध्ये येत नसला तरी सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांसाठी मास्क घालणे बंधनकारक आहे. नागरिकांनी याची काळजी घ्यावी, तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना एकमेकांशी सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.
नागपूर ग्रामीण भाग हा रेड झोनमध्ये येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व दुकानांसह सर्व व्यवहार हे १ जूनपासून सुरळीत सुरू झालेले आहेत. आंतर जिल्हा बससेवाही सुरू आहे. परंतु नागरिकांनी आणि आस्थापनांनी कोरोना संसर्गापासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क घालणे बंधनकारक आहे, एकमेकांशी सामाजिक अंतर राखून नागरिकांनी व्यवहार करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Masks are also mandatory in public places in rural Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.