या उत्पादकांना वार्षिक परतावा भरण्यास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 08:45 PM2020-06-02T20:45:17+5:302020-06-02T20:47:22+5:30

अन्न सुरक्षा व मानके कायदा-२००६ अंतर्गत सर्व अन्नपदार्थ उत्पादकांना ३१ मेपूर्वी वार्षिक परतावा (डी-१) व दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादकांना अर्ध वार्षिक परतावा (डी-२) सादर करणे बंधनकारक आहे. पण, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी अन्नपदार्थ उत्पादकांना वार्षिक व अर्धवार्षिक परतावा सादर करण्यासाठी ११ एप्रिल २०२० च्या परिपत्रकाद्वारे दोन महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे.

Extension to pay annual returns to these producers | या उत्पादकांना वार्षिक परतावा भरण्यास मुदतवाढ

या उत्पादकांना वार्षिक परतावा भरण्यास मुदतवाढ

Next
ठळक मुद्देअन्न व औषधी प्रशासन विभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अन्न सुरक्षा व मानके कायदा-२००६ अंतर्गत सर्व अन्नपदार्थ उत्पादकांना ३१ मेपूर्वी वार्षिक परतावा (डी-१) व दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादकांना अर्ध वार्षिक परतावा (डी-२) सादर करणे बंधनकारक आहे. पण, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी अन्नपदार्थ उत्पादकांना वार्षिक व अर्धवार्षिक परतावा सादर करण्यासाठी ११ एप्रिल २०२० च्या परिपत्रकाद्वारे दोन महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे.
त्यामुळे सर्व अन्नपदार्थ उत्पादकांना ३१ जुलैपूर्वी वार्षिक व अर्धवार्षिक परतावा सादर करता येईल. अन्नपदार्थ उत्पादकांना ३१ जुलैपर्यंत दंड आकारण्यात येणार नाही. यानंतर वार्षिक व अर्धवार्षिक परतावा सादर करणाऱ्या सर्व अन्नपदार्थ उत्पादकांना प्रतिदिन १०० रुपये प्रमाणे विलंब शुल्क आकारण्यात येईल, अशी कायद्यात तरतूद आहे.
मिठाईच्या उत्पादनावर व खुल्या स्वरूपात विक्रीबाबत उत्पादन तिथी व वापरण्याची अंतिम तारीख नमूद करणे १ जून २०२० पासून बंधनकारक केले होते. त्यातही अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार १ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. ३१ जुलैपूर्वी अन्नपदार्थ उत्पादकांनी वार्षिक व अर्धवार्षिक परतावा सादर करण्याचे तसेच मिठाई उत्पादकांनी मिठाईच्या उत्पादनावर व खुल्या स्वरूपात विक्रीबाबत, उत्पादन तिथी व पदार्थ वापरण्याची अंतिम तिथी १ आॅगस्टपासून नमूद करण्याचे आवाहन नागपूर विभागाच्या अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांनी केले आहे.

Web Title: Extension to pay annual returns to these producers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.