महाठग प्रीती दास हिने तिच्या एका वर्ध्याच्या मित्रालाही ठगविल्याचे उघड झाले आहे. नवल राधेश्याम पांडे (वय २९) नामक तरुणाने आज प्रीतीविरुद्ध तक्रार नोंदविली. त्यावरून सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ मे रोजी ४०४ होती. २० दिवसामध्ये यात दुपटीने वाढ होऊन १० जून रोजी ८६३ वर पोहचली. गेल्या १३ दिवसात ४३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...
महापालिकेने शहरातील सर्व नाले व गटारांची सफाई केल्याचा दावा केला असला तरी काही भागातील नाल्यांची अद्याप सफाई झालेली नाही. याशिवाय नाल्यांच्या मेनहोलवरील झाकणे बेपत्ता आहेत. अमरावती रोडवरील भरतनगरमध्ये असेच चित्र असून त्यामुळे प्रसंगी मोठा अपघात होण्य ...
विदेशी सफर घडवून आणतो म्हणून चौघांनी एका व्यक्तीला ५५ हजार रुपयांचा गंडा घातला. सात महिने झाले तरी सफर घडवून आणली नाही किंवा पैसे परत केले नाही त्यामुळे पीडित व्यक्तीने इमामवाडा पोलिसांकडे तक्रार नोंदविली. ...
डिगडोह येथील हसीब फार्मास्युटिकल कंपनीत तीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे पुढील आदेशापर्यंत कंपनी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. ...
खासगी इस्पितळांनी ८० टक्के खाटा अन्य आजारांसाठी (नॉन-कोविड) आरक्षित ठेवून त्यावर शासनाने ठरवून दिलेले अत्यंत कमी शुल्क आकारावे, असे बंधन लादले. हे अन्यायकारक आहे. त्यामुळे सध्या अडचणीत असलेली खासगी आरोग्य व्यवस्था पूर्णत: कोलमडून पडेल, असे मत विदर्भ ...
गावातून निघणारी घाण व सांडपाण्यामुळे कोलार नदी प्रदूषित होत आहे. यावर जिल्हा परिषदेने तात्काळ उपाययोजना न केल्यास, दर महिन्याला ५ ते १० लाख रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल, अशी नोटीस राष्ट्रीय हरित लावादाने जिल्हा परिषदेला बजावली आहे. ...
अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या टाळेबंदीत शिथिलता येताच रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. हे बघून शहरातील भिक्षेकरीही सक्रिय झाले असून भीक मागण्यासाठी पुन्हा गजबज वाढू लागली आहे. मात्र यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. ...
विमानतळावरून शहरात आलेल्या प्रवाशांना मारण्यात येत असलेल्या होम क्वारंटाईन स्टॅम्पमुळे जखमा होऊ लागल्या आहे. या तक्रारी गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्या आहे. पीडितांनी यासंदर्भात महापालिका, आरोग्य विभाग व विमानतळ प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहे. ...
दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सशस्त्र गुंडांना तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी पहाटे जेरबंद केले. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. त्यांचा एक साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. ...