संपूर्ण जगासाठी सध्याचा काळ अत्यंत वाईट आहे. कोरोना महामारीच्या संकटाविरोधात सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला तरच या विषाणूवर विजय प्राप्त करणे सोपे आहे, असे नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मिडियावर म्हटले आहे. ...
सुमारे तीन हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे तांत्रिक उन्नतीकरण करण्यात येत आहे. या उन्नतीकरणामुळे रस्ते अपघातांमध्ये ५० टक्क्यांची घट होईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ...
राज्यामध्ये कोरोना मारक औषधांचा तुटवडा का आहे, असा परखड सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी केंद्र व राज्य सरकारला विचारला आणि यावर एक आठवड्यात सविस्तर उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सेवानिवृत्त इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. शोमा सेन यांना सेवानिवृत्तीनंतरच्या लाभांतील पाच लाख रुपये अदा करण्याचा राज्य सरकारला आदेश दिला. ...
नागपूरसह राज्यातील तीन ठिकाणच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीपुढे आगामी पदोन्नतीचा मुद्दा उपस्थित झाल्याने ठिकठिकाणच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीचे गुऱ्हाळ वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त-अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या बदलीचा विषय रेंगाळला आहे. ...
गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत असलेला कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद याने मौजा झिंगाबाई टाकळी येथील बाबा बगदादियानगरमध्ये बांधलेला अनधिकृत बंगला पाडण्याच्या कारवाईवर स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नकार दिला. ...
स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर नागपुरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे. शुक्रवारी दुपारपासून गस्त सुरू केली जाणार असून एसआरपीएफ, क्यूआरटी, होमगार्ड, आरसीपी यांच्यासह १५०० पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहेत. ...