स्वातंत्र्यदिन सोहळा ; नागपुरात कडेकोट बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 01:35 AM2020-08-14T01:35:43+5:302020-08-14T01:40:24+5:30

स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पाश्­र्वभूमीवर नागपुरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे. शुक्रवारी दुपारपासून गस्त सुरू केली जाणार असून एसआरपीएफ, क्यूआरटी, होमगार्ड, आरसीपी यांच्यासह १५०० पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहेत.

Independence Day celebrations in Nagpur ; Heavy bandobast | स्वातंत्र्यदिन सोहळा ; नागपुरात कडेकोट बंदोबस्त

स्वातंत्र्यदिन सोहळा ; नागपुरात कडेकोट बंदोबस्त

Next
ठळक मुद्देसुरक्षेसाठी १५०० पोलीसएसआरपीएफ, होमगार्ड, क्यूआरटी सज्जएटीएस, बीडीडीएस, एएनओही सक्रियरात्रीची गस्त, ठिकठिकाणी नाकेबंदी, तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पाश्­र्वभूमीवर नागपुरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे. शुक्रवारी दुपारपासून गस्त सुरू केली जाणार असून एसआरपीएफ, क्यूआरटी, होमगार्ड, आरसीपी यांच्यासह १५०० पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठलीही गडबड होऊ नये म्हणून शुक्रवारी दुपारपासून खास सुरक्षा व्यवस्था केली जात आहे.
मुख्य कार्यक्रमस्थळी अर्थात विभागीय आयुक्त कार्यालयात बंदोबस्तासाठी एका पोलीस उपायुक्तसह १६४ पोलीस अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त
शहरातील धार्मिक तसेच सर्व संवेदनशील स्थळे आणि महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला आहे. ठिकठिकाणी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक सज्ज ठेवण्यात आले असून, शुक्रवारी रात्री शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार आहे. संवेदनशील वस्त्यांमध्ये रात्री झडती मोहीम होणार आहे.

बीडीडीएस, एएनओ सक्रिय
दहशतवाद विरोधी पथक आणि नक्षल विरोधी पथकांनाही सक्रिय करण्यात आले आहे. शहरातील ३२ ही पोलीस ठाण्यातील पोलीस आपापल्या भागात बंदोबस्त सांभाळणार आहेत.

संशयिताची माहिती द्या
कोणत्याही ठिकाणी संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तू आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
 

Web Title: Independence Day celebrations in Nagpur ; Heavy bandobast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.