शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

नागपूर विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी ७ कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 20:57 IST

पाण्याच्या बाबतीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी गोसेखुर्द टप्पा २, नांद वणा, दिना, पोथरा, पुजारी टोला बावनथडी आणि तोतलाडोह यासाारखे सात मोठे प्रकल्प कोरडे पडले आहेत. यात ० टक्के साठा आहे. तर उर्वरित धरणात केवळ ६ टक्के इकता पाणीसाठा आहे. गेल्या पाच वर्षातील ही सर्वात भयावह स्थिती आहे.

ठळक मुद्देपाच वर्षातील सर्वात भयावह स्थितीधरणांमध्ये केवळ ६ टक्के पाणी साठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्याच्या बाबतीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी गोसेखुर्द टप्पा २, नांद वणा, दिना, पोथरा, पुजारी टोला बावनथडी आणि तोतलाडोह यासाारखे सात मोठे प्रकल्प कोरडे पडले आहेत. यात ० टक्के साठा आहे. तर उर्वरित धरणात केवळ ६ टक्के इकता पाणीसाठा आहे. गेल्या पाच वर्षातील ही सर्वात भयावह स्थिती आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला (३० मे रोजी) केवळ २०१ दलघमी (६ टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. जलसंपदा विभगाने जारी केलेल्या अहवालानुसार एकूण १८ पैकी ७ प्रकल्प कोरडे आहेत. यामध्ये ० टक्के इतका पाणीसाठा आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पाची क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात ० टक्के इतका पाणीसाठा आहे. कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३५ दलघमी (२५ टक्के) पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीसमध्ये ८ टक्के, लोवर नांद ० टक्के, वडगाव प्रकल्पात १३ टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात १७ टक्के, सिरपूर १९ टक्के, पुजारी टोला ० टक्के, कालिसरार ४९ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये ३ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात २८ टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १२ टक्के, धाममध्ये ४ टक्के, पोथरामध्ये ० टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये ४ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा २ व बावनथडीमध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.पाच वर्षातील स्थितीवर्ष (३० मे रोजी) नोंदवलेला पाणीसाठा२०१९- २०१ दलघमी२०१८ - ३९७ दलघमी२०१७ - ३२३ दलघमी२०१६ - ७३० दलघमी२०१५- ७९६ दलघमी२०१४ - १५२० दलघमीमध्यम व लघु प्रकल्पातील स्थितीही भयावहनागपूर विभागातील मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांची स्थितीही अतिशय बिकट आहे. विभागात एकूण ४० मध्यम प्रकारचे धरण आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ५३७८ दलघमी इतकी आहे. त्यात ३० मे रोजीपर्यंत केवळ ६४ दलघमी म्हणजेच १२ टक्के इतका साठा शिल्लक आहे. तीच परिस्थिती लघु प्रकल्पांची आहे. नागपूर विभागात एकूण ३१४ लघु प्रकल्प आहेत. त्यांची पाणीसाठा क्षमता ५०३ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ४१ दलघमी म्हणजेच आठ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे. मोठ्या अणि लघु प्रकल्पात तर मृतसाठ्यापेक्षाही कमी साठा आहे. मोठ्या प्रकल्पातील एकूण मृतसाठा हा किमान ९२० दलघमी असायला हवा. परंतु त्यात केवळ २०१ दलघमी इतके पाणी आहे. तर लघु प्रकल्पाचा एकूण मृतसाठा हा १६ दलघमी इतका आहे. यात आजच्या घडीला एकूण केवळ ४१ दलघमी इतकाच साठा शिल्लक आहे.

टॅग्स :DamधरणVidarbhaविदर्भwater shortageपाणीटंचाई