मोबाईल विकण्यास विरोध, तरुणावर रॉडने हल्ला

By योगेश पांडे | Updated: October 3, 2023 15:23 IST2023-10-03T15:22:47+5:302023-10-03T15:23:47+5:30

अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

Opposition to selling mobile phones, youth attacked with rod | मोबाईल विकण्यास विरोध, तरुणावर रॉडने हल्ला

मोबाईल विकण्यास विरोध, तरुणावर रॉडने हल्ला

नागपूर : मोबाईल विकण्यापासून थांबविल्याने एका आरोपीने ऑटोचालकावर लोखंडी रॉडने प्रहार करत गंभीर जखमी केले. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

इशांत संजय शंभरकर (३५, सावित्रीबाई फुलेनगर, जादुमहल चौक) असे तक्रारदाराचे नाव आहे. इशांत हा ऑटोचालक असून त्याच्या घराजवळच गोलू प्रकाश बागडे हा राहतो. तीन दिवसांअगोदर गोलू रात्रीच्या सुमारास इशांतच्या ऑटोत बसला होता व तेथून जाताना तो इशांतचा मोबाईल घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी गोलूच्या आईने येऊन सांगितले की गोलू तो मोबाईल विकण्याच्या तयारीत आहे. हे ऐकताच इशांत गोलूकडे गेला व स्वत:चा मोबाईल परत आणला. त्यानंतर गोलू संतापला होता व तो इशांतच्या घरासमोर गेला. त्याने इशांतला बाहेर बोलविले व काही कळायच्या आतच त्याच्यावर लोखंडी रॉडने प्रहार केले. आरडाओरडीमुळे लोक गोळा झाले व त्यामुळे गोलू फरार झाला. जखमी अवस्थेतील इशांतला दवाखान्यात नेण्यात आले. त्याच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात गोलूविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Opposition to selling mobile phones, youth attacked with rod