मोबाईल टॉवरला नागपुरातील फाळके ले-आऊटच्या नागरिकांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:34 IST2019-07-09T23:33:07+5:302019-07-09T23:34:50+5:30
मोबाईल टॉवरचे वाढते दुष्परिणाम लक्षात घेता, लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशात फाळके ले-आऊटमध्ये एक बिल्डर परिसरातील रहिवाशांची परवानगी न घेता मोबाईल टॉवर उभारत आहे. टॉवरचे रेडिएअशन लोकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याने फाळके ले-आऊटच्या लोकांचा अवैधरीत्या उभारण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवरला विरोध होत आहे.

मोबाईल टॉवरला नागपुरातील फाळके ले-आऊटच्या नागरिकांचा विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोबाईल टॉवरचे वाढते दुष्परिणाम लक्षात घेता, लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशात फाळके ले-आऊटमध्ये एक बिल्डर परिसरातील रहिवाशांची परवानगी न घेता मोबाईल टॉवर उभारत आहे. टॉवरचे रेडिएअशन लोकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याने फाळके ले-आऊटच्या लोकांचा अवैधरीत्या उभारण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवरला विरोध होत आहे.
फळके ले-आऊट मधील ३८ क्रमांकाच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या इमारतीवर दीपक सोनी यांच्याकडून अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारणीच्या बांधकामास सुरुवात केली आहे. सोनी यांनी मोबाईलचे टॉवर उभारताना आजूबाजूच्या लोकांची कुठलीही परवानगी घेतलेली नाही. रेडिएशन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते मोबाईल टॉवर जिथे उभा होतो, तेथून ३०० ते ४०० मीटर अंतरावर ७ ते ८ हजार मायक्रोवॅट रेडिएशन होते. रेडिएशनचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. डोकेदुखी, चिडचिड वाढणे यासारख्या समस्या वाढतात. ४ ते ५ वर्ष सातत्याने टॉवरच्या संपर्कात राहिल्यास ब्रेनट्युमर, ब्रेनकॅन्सरसारखे आजार वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या मनामध्ये भीती आहे. अशात दीपक सोनी कुठलीही परवानगी न घेता, टॉवर उभारत आहे. हे टॉवर अनाधिकृत असून, टॉवरचे बांधकाम थांबविण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी नासुप्रकडे केली आहे. यासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यासने गिट्टीखदान पोलीस स्टेशनकडे कारवाई संदर्भात तक्रार पाठविली आहे. कुठल्याही परिस्थितीत टॉवर उभारण्यात येऊ नये, अशी मागणी येथील ज्ञानेश्वर वाकोडीकर, जानराव, चैतराम पौनीकर, मधुकर हेलोंडे, दुर्गेश रॉय, पंजाबराव काकडे, मधुकर डोये, व्यंकट डोये, प्रभाकर डोये, मनोहर डोये, कृष्णा बोराटे, रेखा पौनीकर, सोनिया किनरा, नाजिया शेख, जितेंद्र किनरा, संगीता मारवडकर, पराग वैद्य, ऋषिकेश कथलकर, मीरा वरखडे, गंगाधर आंभोरे, नीलेश भुसारी, संजय शिंगणे, लता बोंद्रे, उषा प्रसाद, संजय फिस्के, प्रशांत ठाकरे आदींनी केली आहे.