लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ब्राह्मण सेना फाऊंडेशन व राजपूत करणी सेनेतर्फे ‘आर्टिकल १५’ या चित्रपटाच्या विरोधात शनिवारी संविधान चौकात निदर्शने केली.ब्राह्मण सेनेचे अध्यक्ष मनीष त्रिवेदी यांनी सांगितले की, या चित्रपटात ब्राह्मण समजाला कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ब्राह्मण समाज हा नेहमीच संस्कृती व ज्ञान प्रसारित करण्यासाठी ओळखला जातो. या चित्रपटाद्वारे एकप्रकारे ब्राह्मण समाजालाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या चित्रपटात जी कथा ब्राह्मणांवर दर्शविण्यात आली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. यावेळी करणी सेनेचे नागपूर शहर अध्यक्ष प्रमोद सिंह ठाकूर यांनी सांगितले की, असे कुठलेही चुकीचे काम ब्राह्मण समाजाकडून झालेले नसताना ब्राह्मण समाजालाच टारगेट का करण्यात आले आहे. आम्ही सर्वच याचा विरोध करतो.निदर्शन आंदोलनात जयमाला तिवारी, रामनारायण मिश्रा, विकास ढिमोले, चिंटू पुरोहित, प्रतीक त्रिवेदी, विजय मोघे, प्रवीण पांडे, मनीषा पाठक, ज्योती द्विवेदी, सुषमा मिश्रा, आशिष दीक्षित, भगवंत पांडे, रोहित शर्मा, दीपा पचोरी, सी.पी. पांडे आदी उपस्थित होते.
‘आर्टिकल १५’ चित्रपटाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:17 IST
ब्राह्मण सेना फाऊंडेशन व राजपूत करणी सेनेतर्फे ‘आर्टिकल १५’ या चित्रपटाच्या विरोधात शनिवारी संविधान चौकात निदर्शने केली.
‘आर्टिकल १५’ चित्रपटाला विरोध
ठळक मुद्देब्राह्मण सेना फाऊंडेशन व श्री राजपूत करणी सेनेतर्फे निदर्शने