शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

आॅपरेशन : गुन्हेगारांचे अन् पोलिसांचे

By admin | Updated: May 15, 2015 02:42 IST

कारागृहातून पळून जाण्याचा कट अमलात आणल्याच्या काही तासातच सत्येंद्र गुप्ता, शिबू खान, प्रेम ऊर्फ नेपाली खत्री, बिशनसिंग उके आणि गोलू ऊर्फ आकाश ठाकूर आदींनी बैतूलजवळ पोलिसांवर फायरिग केली.

बैतूलजवळ गोळीबार : गुप्ताने केले मोठे कांड, गेम करण्यासाठीच परतले शिबू अन् नेपालीनागपूर : कारागृहातून पळून जाण्याचा कट अमलात आणल्याच्या काही तासातच सत्येंद्र गुप्ता, शिबू खान, प्रेम ऊर्फ नेपाली खत्री, बिशनसिंग उके आणि गोलू ऊर्फ आकाश ठाकूर आदींनी बैतूलजवळ पोलिसांवर फायरिग केली. त्यानंतर पुन्हा सत्येंद्र गुप्ताने एक मोठा गुन्हा केला तर, गुरुवारी पोलिसांच्या सापळ्यात अडकलेला शिबू आणि नेपाली हे मोठा गेम करण्याच्या तयारीतच उपराजधानीकडे परतले होते, अशी खळबळजनक माहिती उघड झाली आहे. कारागृहाची सुरक्षा यंत्रणा भेदून उपरोक्त आरोपी कारागृहातून मध्यप्रदेशातील बैतूलला गेले. तेथे त्यांच्या संशयास्पद हालचाली पाहून एक पोलीस हवालदार त्यांच्याकडे आला. तो पकडणार हे लक्षात येताच सत्येंद्र आणि शिबूच्या साथीदारांनी त्या पोलीस हवालदारावर गोळीबार केला. त्यानंतर बैतुल, भोपाळ, छिंदवाडा, झाशी, कानपूरसह ठिकठिकाणी हे फिरत होते. या दरम्यान सत्येंद्र गुप्ताने एक मोठा गुन्हा करून रक्कम लुटली. तो तसेच बिशन उके आणि गोलू ठाकूर दुसरीकडे पळाले तर, शिबू आणि नेपाली दुसरीकडे पळाले. ओळखीच्या ठिकठिकाणच्या गुन्हेगारांकडे त्यांनी आश्रय घेतला. शिबू आणि सलिमकडे पैसे नसल्यामुळे अस्वस्थ होते. पोलिसांनी त्यांच्यावर एका गुन्हेगाराच्या मदतीने जाळे फेकले. ‘बडा गेम है. लाखो मिलेंगे‘ म्हणत त्याला नागपूरला बोलविले. पैसे मिळणार आणि नातेवाईकांनाही भेटू‘ अशा दुहेरी हेतूने शिबू नेपालीसह कोराडीच्या बोखाराजवळ परतला. गेम करण्यासाठी त्यांनी पूर्ण तयारीनेच नागपूरकडे धाव घेतली. दुसरीकडे त्यांच्या मुसक्या बांधण्यासाठी गुन्हेशाखेच्या उपायुक्त मासिरकर यांनी निवडक साथीदारांना सोबत घेत बुधवारी रात्रीपासून आॅपरेशन सुरू केले. कुठे जाणार, कशासाठी जाणार, त्याची कोणत्याच पोलीस कर्मचाऱ्याला माहिती नव्हती. अत्यंत गोपनीय पध्दतीने रात्रीपासून ‘आॅपरेशन‘ सुरू झाले अन् शिबू, नेपाली तसेच अरमानच्या अटकेच्या रूपाने पोलिसांचे आॅपरेशन गुरुवारी सकाळी यशस्वी झाले. या सर्व प्रकारात उपायुक्त दीपाली मासिरकर यांची भूमिका प्रशंसनीय आहे. (प्रतिनिधी)