शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

अपयश हीच यशाची सुरुवात

By admin | Updated: May 19, 2016 02:57 IST

कौशल्य विकास व प्रशिक्षच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. आत्मविश्वास बाळगा,अपयशामुळे खचू नका

राजकुमार बडोले : फॉॅर्च्युन फाऊं डेशनच्या कार्यशाळेचा समारोपनागपूर : कौशल्य विकास व प्रशिक्षच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. आत्मविश्वास बाळगा,अपयशामुळे खचू नका तर अपयश हीच यशाची सुरुवात असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी केले. फॉर्च्युन फाऊं डेशनतर्फे एअर डंडिया केबीन क्रू प्री रिक्रुटमेंट संदर्भात एअर इंडियाच्या मार्गदर्शनात शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे, भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी, फॉर्च्युन फाऊं डेशनचे अध्यक्ष आमदार प्रा.अनिल सोले, संयोजक आमदार डॉ. मिलिंद माने, हेमंत सुटे, आशुतोष नगराळे आदी उपस्थित होते. युपीएससी परिक्षेत विपरित परिस्थितीवर मात करून अनेकांनी यश प्राप्त केले. एअर डंडिया केबीन क्रू प्री रिक्रुटमेंट परीक्षेत उमेदवारांनाही यश मिळेल. असा आत्मविश्वास निर्माण व्हावा, या हेतुने फॉर्च्युन फाऊं डेशनच्या माध्यमातून तीन दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. प्रशिक्षणामुळे यातील ८५ टक्के उमेदवारांची निवड होईल, असा विश्वास बडोले यांनी व्यक्त केला.प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांचे आयुष्य घडेल. सोबतच युवक प्रशिक्षित असेल तर आदर्श राज्य निर्माण होईल. या हेतुनेच अशा कार्यशाळा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती श्वेता शालिनी यांनी दिली. एअर इंडियात नोकरीच्या संधी आहेत. या परीक्षांची तयारी कशी करावी. गणवेश कसा असावा. व्यक्तिमत्त्व विकास अशा बाबींची उमेदवारांना माहिती व्हावी. या हेतूने फॉर्च्युन फाऊं डेशन व बार्टीच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात ३०० उमेदवारांनी सहभाग घेतला. यातून अनेकांना एअर इंडियात नोकरीची संधी उपलब्ध होण्याला मदत होईल. असा विश्वास अनिल सोले यांनी व्यक्त केला. यापूर्वीही बार्टीच्या माध्यमातून फॉर्च्युन फाऊं डेशनतर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात सहभागी ८० उमेदवारापैकी ४५ उमेदवारांची निवड करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.फॉर्च्युन फाऊं डेशनचा हा स्तुत्य उपक्रम आहे. या प्रशिक्षणाचा युवकांना भविष्यात उपयोग होईल. असा विश्वास राजेश ढाबरे यांनी व्यक्त केला. डॉ. मिलिंद माने, हेमंत सुटे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)