शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक सुरू केल्याचा केवळ देखावा

By admin | Updated: April 23, 2016 03:11 IST

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असलेली नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुरू केल्याचा गवगवा राज्य सरकारतर्फे करण्यात आला.

अनिल देशमुख यांचा आरोप : कर्जासाठी टाकल्या जाचक अटीनागपूर : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असलेली नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुरू केल्याचा गवगवा राज्य सरकारतर्फे करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात जाचक अटी टाकून शेतकऱ्यांना कृषी कर्ज देण्यासाठी आता टाळाटाळ केली जात आहे. ही बँक सुरू झाली असली तरी शेतकऱ्यांना याचा कुठलाही फायदा होणार नाही. सरकारने जाचक अटी टाकून आर्थिक टंचाईत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित ठेवले आहे, असा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.देशमुख यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी करीत राज्य सरकारवर नेम साधला आहे. देशमुख यांनी म्हटले आहे की, आपण मंत्री असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत भांडून ३१९ कोटी रुपये मंजूर करून घेतले होते. यानंतर काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या व त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या. याच निवडणुकीच्या काळात प्रचाराचा मुदा करीत भाजपने सत्तेत येताच नागपूर जिल्हा बँक सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असल्यावर यावर लवकरच तोडगा निघेल अशी आशा होती. मात्र, तब्बल दीड वर्ष लागले. आता ही बँक सुरू झाल्याने आर्थिक टंचाईत असलेल्या शेतकऱ्यांना मदत होईल असे वाटत होते. मात्र, कर्ज देण्यासाठी जाचक अटी टाकून शेतकऱ्यांना कर्ज घेण्यापासून वंचित ठेवण्याचे काम केले जात आहे, असा आरोप देशमुख यांनी केला आहे. ज्यांनी यापूर्वीच बँक डबघाईस असताना मदत व्हावी म्हणून कर्ज चुकते केले त्यांना यावर्षी कर्ज देण्यात येणार नाही. यामुळे कर्ज चुकवून शेतकऱ्यांनी गुन्हा केला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यांच्यावर आता कर्ज आहे त्यांनी जर पूर्ण कर्ज भरले तर त्यांना नव्याने एक लाख रुपये कर्ज देण्यात येईल. एवढेच नव्हे तर कर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रातही वाढ करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून कर्ज देण्यास सुरुवात केली असताना आतापर्यंत केवळ १५ लाख रुपयांच्या कर्जाचे तुटपुंजे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा बँक सुरू झाल्याने आपणास सुलभतेने कर्ज मिळेल असे शेतकऱ्यांना वाटत होते. परंतु ही बँक सुरू करून कर्ज न देता त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम भाजपा सरकार करीत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. (प्रतिनिधी)थकीत कर्ज कसे भरणार?सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शासनाने एक रुपयाचीही मदत केलेली नाही. कापसाला योग्य भाव मिळाला नाही. संत्रा मातीमोल भावाने गेला. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यांच्याकडे पुढील हंगामात पेरणीसाठी पैसे नाहीत. अशा परिस्थितीत शेतकरी थकीत कर्ज कसे भरणार, यावर सरकारने विचार केलेला नाही अशी टीकाही देशमुख यांनी केली आहे.