एसटीच्या एका बसमध्ये केवळ ९ प्रवासी : प्रतिसाद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:42 IST2020-05-30T23:40:38+5:302020-05-30T23:42:48+5:30
ग्रामीण भागात वाहतूक सुरु करण्याचे आदेश आल्यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात वाहतूक सुरु करण्यात आली. परंतु आठ दिवस होऊनही एसटी महामंडळाला प्र्रवासी मिळत नाहीत. आठ दिवसानंतर शनिवारी एका बसमध्ये केवळ ९ प्रवासी असल्याची स्थिती होती.

एसटीच्या एका बसमध्ये केवळ ९ प्रवासी : प्रतिसाद नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीण भागात वाहतूक सुरु करण्याचे आदेश आल्यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात वाहतूक सुरु करण्यात आली. परंतु आठ दिवस होऊनही एसटी महामंडळाला प्र्रवासी मिळत नाहीत. आठ दिवसानंतर शनिवारी एका बसमध्ये केवळ ९ प्रवासी असल्याची स्थिती होती.
एसटीच्या प्रशासनाने ग्रामीण भागात वाहतूक सुरू करण्याचे आदेश दिल्यामुळे नागपूर विभागात २२ मे पासून ग्रामीण भागात बसेस सुरू करण्यात आल्या. पहिल्या दिवशी एसटीच्या बसेसला केवळ एका बसमागे एकच प्रवासी मिळाला. नुकसान होऊनही एसटी महामंडळाने ग्रामीण भागात वाहतुक सुरूच ठेवली. प्रवाशांची संख्या वाढून आठ दिवसानंतर ९ झाली आहे. परंतु एसटीला नुकसान सोसावे लागत आहे. अशा परिस्थितीत मध्यवर्ती कार्यालयातून आदेश आल्यामुळे एसटीचे अधिकारी ही सेवा ३१ मे पर्यंत सुरू ठेवणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत ते वाट पाहतील. परंतु मागील आठ दिवसांपासून नुकसान होत असूनही एसटीच्या बसेस सेवा देत आहेत.
एसटीवर विश्वास वाढत आहे
‘पहिल्या दिवशी बसेसची वाहतूक सुरू केल्यानंतर एका बसमध्ये एकच प्रवासी अशी स्थिती होती. परंतु आठ दिवसानंतर बसेसमध्ये ९ प्रवासी झाले आहेत. हळुहळु एसटीवरील प्रवाशांचा विश्वास वाढत आहे. पुढील काळात अजून प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल.’
नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग