शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीचे केवळ १० आमदार प्रभावशाली

By admin | Updated: May 19, 2014 00:49 IST

महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसच्या पानिपतासाठी ‘नमो’ त्सुनामीसह विविध कारणांचा यासाठी बागुलबुवा केला जात आहे. मात्र राज्यातील या पक्षाच्या काही आमदारांनी आघाडीच्या उमेदवारांना आपल्या

 विलास गावंडे -यवतमाळ

महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसच्या पानिपतासाठी ‘नमो’ त्सुनामीसह विविध कारणांचा यासाठी बागुलबुवा केला जात आहे. मात्र राज्यातील या पक्षाच्या काही आमदारांनी आघाडीच्या उमेदवारांना आपल्या मतदारसंघातून आघाडी मिळवून दिली आहे. राज्यात सत्ता असलेल्या या पक्षाच्या एकूण १४४ सदस्यांपैकी केवळ १० आमदार प्रभावशाली ठरले आहे. लोकसभेत महायुतीचा उमेदवार विजयी झालेल्या मतदारसंघातील हे आमदार आहेत. २८८ सदस्य संख्या असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसचे ८२ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ६२ सदस्य आहेत. १४ व्या लोकसभेत हे आमदार आपल्या पक्षाच्या उमेदवाराला आघाडी मिळवून देतील, ही स्वाभाविक अपेक्षा असताना केवळ १० आमदार या परीक्षेत पास झाले आहेत. लोकसभेच्या बहुतांश मतदारसंघात आघाडीतील सहकारी पक्षाने प्रामाणिकपणे काम केले नाही, अशी ओरड आहे. याच कारणाखाली आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र दहा आमदारांनी आपल्या मतदारसंघात घेतलेली आघाडी या प्रश्नालाही बाजूला सारणारी आहे. प्रत्येक पक्षात मतभेद असतातच पण परिस्थिती पाहून त्याला सामोरे जावे लागते. नेमके हेच या दहा आमदारांनी दाखवून दिले आहे. इतर आमदारांसाठी हा एक धडा आहे. महाराष्ट्रातील काही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. या मतदारसंघांमध्ये असलेल्या या पक्षाच्या काही आमदारांना आघाडी मिळवून देता आली नसली तरी इतर सहकारी आमदारांनी दिलेली साथ या पक्षाच्या उमेदवारांच्या यशात मैलाचा दगड ठरली आहे. लोकप्रतिनिधीचा आपल्या मतदारसंघावर प्रभाव असला तर कुठलीही लाट आणि विरोध झुगारून यश संपादन करता येते, हेच यातून सिद्ध झाले आहे.