शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
3
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
4
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
5
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
6
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
7
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
8
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
9
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
10
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
11
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
12
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
13
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
14
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
15
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
16
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
17
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
18
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
19
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

एक गणवेश शाळेच्या पहिल्याच दिवशी, पण दुसऱ्याचा अजूनही ठावठिकाणा नाही!

By गणेश हुड | Updated: June 12, 2023 18:02 IST

जि.प.कडून तालुकास्तरावर १.१९ कोटी वळते

नागपूर :  समग्र शिक्षा अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत दोन गणवेश दिले जातात. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळावा, याकरिता शासनाकडून एका गणवेशासाठी निधी प्राप्त झाला.   जिल्हा परिषद प्रशासनाने विद्यार्थी संख्येनिहाय , हा निधी तालुकास्तरावर वळता केला असून विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.  परंतु राज्य सरकारने एक गणवेश सर्व विद्यार्थ्यांना एकाच  रंगाचा देण्याचा निर्णय घेतला. मात्र हा गणवेश कधी मिळणार हा संभ्रम कायम आहे. 

एका गणवेशासाठी जि.प. प्रशासनाने १.९९ कोटीवरील निधी शाळास्तरावर वळता करण्यात आला आहे.  शाळा स्तरावर गणवेशाची खरेदी केली जाणार आहे  समग्रअंतर्गत महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाºया सर्व मुली, एससी, एसटी आणि बीपीएल संवर्गातील मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ दिल्या जातो. त्यानुसार समग्रच्या २०२३-२४ च्या बजेटमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गणवेश संचाकरिता ६०० रुपये मंजूरही करण्यात आले आहे.

नागपूर जि.प. शिक्षण विभागानेही  २०२३-२४ या शैक्षणिक सत्रासाठी  साठी १५१५ शाळांतील ६६ हजार ५१६ विद्यार्थ्यांची नोंदणीही आॅनलाईनरित्या पूर्ण केली होती. परंतु शैक्षणिक सत्र सुरु होण्याची तारीख तोंडावर येऊनही शासनाकडून कुठल्याही सूच्ना नव्हत्या. जि.प. शिक्षण विभाग, शाळा व्यवस्थापन समिती सर्व संभ्रमात होते. मात्र, २९ मे रोजी २०२३ रोजी शिक्षण परिषदेने पत्र काढून हा संभ्रम दूर केला आहे. सोबतच जूनच्या पहिल्याच आठवड्यात विद्यार्थ्यांच्या एका गणवेशासाठी ३०० रुपयाप्रमाणे ६६ हजार ५१६ विद्यार्थ्यांकरिता शासनस्तररावरुन जिल्हा परिषदेकडे १ कोटी ९९ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा निधीही वळता झाला.  दुसऱ्या गणवेशाबाबत अद्यापही निर्णय हा गुलदस्त्यातच आहे. शाळा व्यवस्थापन समिती निर्णय घेणार

गणवेश खरेदीचे अधिकार (गणवेश रंग, प्रकार, स्पेशिफिकेशन आदी) दरवर्षीप्रमाणेच यंदाही शाळा व्यवस्थापन समितीलाच बहाल आहेत. त्यानुसार तालुकास्तरावरुन शाळांना निधी मिळताच, त्यांच्याकडून दरपत्रक मागवित विद्यार्थ्यांकरिता मापानुसार गणवेश खरेदी करायचा आहे. आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी अर्थात ३० जून २०२३ रोजी विद्यार्थ्यांना या गणवेशाचे वितरणही करायचे आहे. विशेष म्हणजे, गणवेश पुरवठादारास देयक हे रोखीने अदा न करता ते ‘पीएफएमएस’ प्रणालीव्दारेच करायची आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाEducationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळाzpजिल्हा परिषदnagpurनागपूर