एक कोटीच्या लालसेपोटी एक लाख गमावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 11:18 PM2021-05-18T23:18:15+5:302021-05-18T23:19:12+5:30

fraud, crime news स्वतःला बँकेचा मॅनेजर असल्याचे सांगून, एका आरोपीने एक कोटी रुपये मिळवून देण्याची थाप मारली. त्याच्या आमिषाला बळी पडून एका व्यक्तीने आपले एक लाख रुपये गमावले.

One lakh lost for the lure of one crore | एक कोटीच्या लालसेपोटी एक लाख गमावले

एक कोटीच्या लालसेपोटी एक लाख गमावले

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्वतःला बँकेचा मॅनेजर असल्याचे सांगून, एका आरोपीने एक कोटी रुपये मिळवून देण्याची थाप मारली. त्याच्या आमिषाला बळी पडून एका व्यक्तीने आपले एक लाख रुपये गमावले. छोटेलाल नगीनाराम भारती (वय ३४) असे फसगत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते खापरखेडा येथील रहिवासी आहेत. भारती यांची आरोपी चेतन निशांत रेवतकर उर्फ चेतन मौंदेकर (रा.जागनाथ बुधवारी) याच्यासोबत दहा वर्षांपासून ओळखी आहे. आरोपी रेवतकर उर्फ मौदेकर याने ११ एप्रिल रोजी भारतीला गाठले. मी स्टेट बँकेच्या छाप्रूनगर शाखेत असिस्टंट मॅनेजर आहे. तेथे विक्की प्रमोद भारती यांची एक कोटी रुपयाची पॉलिसी असून, ते मरण पावले आहेत. त्यामुळे विकी भारतीचे वारसदार असल्याचे दाखवून तुम्हाला पॉलिसीचे एक कोटी रुपये मिळवून देतो, अशी थाप मारली. त्यासाठी आधी दोन लाख रुपये द्यावे लागेल, असे म्हटले. भारतीने आपल्याकडे एक लाख रुपये आहे, असे सांगितले. ते घेऊन बदल्यात एक कोटीची बनावट पॉलिसी आरोपी रेवतकरने भारती यांच्या हातात ठेवली. भारती ही पॉलिसी घेऊन २० एप्रिलला खापरखेडाच्या स्टेट बँकेत गेले. तेथे ही पॉलिसी बनावट असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे ते परत स्टेट बँकेच्या छाप्रूनगर शाखेत आले. तेथे चेतन रेवतकर नावाचा कुणीही मॅनेजर नसल्याचे त्यांना कळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी सोमवारी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी केली जात आहे.

Web Title: One lakh lost for the lure of one crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.