केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या फार्म हाऊसवर बॉयलरचा स्फोट, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 14:02 IST2018-05-23T13:47:01+5:302018-05-23T14:02:03+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील फार्म हाऊसवर बॉयलरचा स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या फार्म हाऊसवर बॉयलरचा स्फोट, एकाचा मृत्यू
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील फार्म हाऊसवर बॉयलरचा स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. धापेवडा येथील ही घटना आहे. या स्फोटामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला आहे. पद्माकर श्रीराव (वय 45 वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे.
मंगळवारी (22 मे) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन यांच्या मालकीची 'कांचन इंडिया' सौंदर्य प्रसाधन कंपनी आहे. यासाठी आवश्यक उत्पादन गडकरी यांच्या फार्म हाऊस परिसरात घेतले जातात. याठिकाणी हळद उकळवण्यासाठी एक बॉयलर आहे. याच बॉयलरचा मंगळवारी संध्याकाळी अचानक स्फोट झाला. या स्फोटात एका मजुराचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. दरम्यान, ज्यावेळी स्फोट झाला तेव्हा घटनास्थळी कांचन गडकरीदेखील उपस्थित होत्या, अशी माहिती समोर आली आहे.