शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
2
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
3
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
5
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
6
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
7
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
8
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
9
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
10
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
11
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
12
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
13
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
14
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
15
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
16
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
17
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
18
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
19
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
20
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात दाेघांचा मृत्यू, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:24 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : वेगात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने माेटारसायकलला मागून जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील दाेघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

पारशिवनी : वेगात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने माेटारसायकलला मागून जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील दाेघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे, तिघेही मित्र आहेत. ही घटना पारशिवनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात बुधवारी (दि. ६) सायंकाळी घडली. या घटनेचे पडसाद गुरुवारी (दि. ७) सकाळी उमटले. अपघात टाळण्यासाठी विविध उपाययाेजना कराव्या या मागणीसाठी शहरात ‘रास्ता राेकाे’ आंदाेलन करण्यात आले.

यश भालेराव (१७), अनुप अतुल पनवेलकर (१४) अशी मृतांची तर लकी चव्हाण (१४) असे जखमीचे नाव आहे. तिघेही मित्र असून, पारशिवनी शहरातील रहिवासी आहेत. ते एमएच-४०/बीबी-४१३७ क्रमांकाच्या माेटारसायकलने खापरखेडा (ता. सावनेर) येथून पारशिवनीला येत हाेते. ते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात पाेहाेचताच मागून वेगात येणाऱ्या एमएपी-४८/पी-०२९१ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने त्यांच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात यश व अनुपचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर लकी गंभीर जखमी झाला.

अपघात हाेताच नागरिकांसह पाेलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दाेघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तर लकीला उपचारासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे लकीवर प्रथमाेपचार करून त्याला उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी ट्रॅव्हल्सचालक प्रकाश डहारे (४५, रा. मुलताई, जिल्हा बैतूल, मध्य प्रदेश) याच्या विराेधात गुन्हा नाेंदवून त्याला अटक केली.

या घटनेचे पडसाद गुरुवारी सकाळी उमटले. संतप्त नागरिकांनी घटनास्थळी ‘रास्ता राेकाे’ आंदाेलन केले. आंदाेलनाची तीव्रता लक्षात घेता रामटेक व देवलापार पाेलीस ठाण्यातून अतिरिक्त पाेलीस कुमक बाेलावण्यात आली हाेती. सकाळी ८ वाजतापासून सुरू झालेले आंदाेलन दुपारी २ वाजेपर्यंत सुरू हाेते. अधिकाऱ्यांनी तहसीलदार वरूणकुमार सहारे व ठाणेदार संताेष वैरागडे यांच्या उपस्थित उपाययाेजना करण्याचे फाेनवर आश्वासन दिल्याने आंदाेलन मागे घेण्यात आले. या आंदाेलनात नगराध्यक्ष प्रतिभा कुंभलकर, सलीम बाघाडे, भुजंग ढोरे, विजय भुते, रूपेश खंडारे, सचिन सोमकुवर, अनिता भड, सागर सायरे, वीरेंद्र गजभिये, दीपक शिवरकर, रोशन पिंपरामुळे, राहुल ढगे, किशोर वैद्य, चेतन देशमुख, सुरेंद्र चोरडिया, प्रमोद भड, अर्षद शेख, विजय बोथरा, रणजित ठाकूर, मोहन लोहकरे, पुखराज जैन, दीपचंद पालीवाल, दीपक भोयर, संजय कुंभलकर, सोनल वैद्य, शकील शेख, नीतू भुजाडे, परसराम राऊत, रितेश बावणे, आशिष भड, राधेश्याम नखाते यांच्यासह नागरिक सहभागी झाले हाेते.

...

या उपाययाेजना आवश्यक

पारशिवनी शहरातील अपघात टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकासोबतच साई लेआऊट चौक, बँक ऑफ इंडिया चौक, शासकीय रुग्णालय, तहसील कार्यालय चौक, महात्मा गांधी चौक या ठिकाणी तत्काळ गतिरोधक तयार करणे, दिवाणी व फौजदारी न्यायालय ते महात्मा गांधी महाविद्यालय या राेडवरील बंद असलेले पथदिवे सुरू करणे, वर्दळीच्या चौकात वाहतूक पोलील तैनात करणे, ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावणे या उपाययाेजना करण्याची मागणी नागरिकांनी रेटून धरली हाेती.

...

दाेघेही विद्यार्थी

यश हा माेटारसायकल चालवत हाेता. त्याने दहावी नापास झाल्यानंतर शिक्षण साेडले हाेते. अनुप व लकी मात्र बाभूळवाडा (ता. पारशिवनी) येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील इयत्ता नववीचे विद्यार्थी आहेत. तिघेही मित्र असून, ते सामान्य घरातील आहेत. यशचे वडील वाहनचालक म्हणून काम करतात. नागरिकांचा राेष लक्षात घेता अपघाताला कारणीभूत ठरलेली ट्रॅव्हल्स खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आली.

...