अनियंत्रित दुचाकी दुभाजकावर आदळली; एकाचा मृत्यू, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 18:14 IST2021-12-03T18:09:50+5:302021-12-03T18:14:30+5:30
अनियंत्रित दुचाकी दुभाजकावर आदळून दुचाकीचालकाचा मृत्यू झाला तर, अन्य एक गंभीर जखमी झाला. ही घटना आज सकाळी ११च्या सुमारास खापा-पारशिवनी राेडवरील काेथुळणा गावाजवळ घडली.

अनियंत्रित दुचाकी दुभाजकावर आदळली; एकाचा मृत्यू, एक जखमी
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित माेटारसायकल थेट दुभाजकावर आदळली. यात दुचाकीस्वार एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खापा-पारशिवनी राेडवरील काेथुळणा गावाजवळ शुक्रवारी (दि. ३) सकाळी ११ च्या सुमारास घडली.
कोमल गणेश तराने (वय २४, रा. दहेगाव जाेशी, ता. पारशिवनी) असे मृताचे, नीलेश मोरेश्वर कडू (रा. दहेगाव जाेशी, ता. पारशिवनी) असे गंभीर जखमीचे नाव आहे. दाेघेही (एमएच-४०/एडी-०५१६) या क्रमांकाच्या माेटारसायकलने खाप्याहून पारशिवनीमार्गे दहेगाव जाेशीला जात हाेते. दरम्यान, मार्गावरील काेथुळणा गावाजवळ पाेहाेचताच चालकाचा माेटारसायकलवरील ताबा सुटला आणि माेटारसायकल दुभाजकावर आदळली.
या घटनेत दाेघांनाही गंभीर दुखापत झाली. मात्र, काेमलचा काही वेळात घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून नीलेशला उपचारासाठी सावनेर येथील शासकीय रुग्णालयात रवाना केले, तर काेमलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खापा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणला. याप्रकरणी खापा पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.