नागपुरात क्षुल्लक वादातून एकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 19:29 IST2020-05-25T19:17:43+5:302020-05-25T19:29:05+5:30

जेवण केल्यानंतर तीन मित्र आपल्या घराजवळ फिरत असताना दुचाकीवर आलेल्या ९ आरोपींनी या तिघांपैकी एकाला मारहाण केली तर दोघांना पाहून घेण्याची धमकी देऊन पळ काढला. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नानक गार्डन जवळ रविवारी रात्री ११ ते ११.१५ च्या दरम्यान ही घटना घडली.

One beaten in a trivial dispute in Nagpur | नागपुरात क्षुल्लक वादातून एकाला मारहाण

नागपुरात क्षुल्लक वादातून एकाला मारहाण

ठळक मुद्देदोघांना धमकी : शांतिनगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जेवण केल्यानंतर तीन मित्र आपल्या घराजवळ फिरत असताना दुचाकीवर आलेल्या ९ आरोपींनी या तिघांपैकी एकाला मारहाण केली तर दोघांना पाहून घेण्याची धमकी देऊन पळ काढला. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नानक गार्डन जवळ रविवारी रात्री ११ ते ११.१५ च्या दरम्यान ही घटना घडली. मनीष रामचंद्र जेतवानी (रा. शांतिनगर कॉलनी) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांचे मित्र नितीन रोहरा तसेच भरत वासवानी हे रविवारी रात्री जेवण केल्यानंतर परिसरात पायी फिरत होते. अचानक चार दुचाकींवर नऊ आरोपी त्याच्याजवळ आले. त्यांनी जेतवानी आणि त्यांच्या मित्रांना अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे नितीन रोहरा यांनी त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी नितीन यांना मारहाण केली. अन्य दोघांना देख लेंगे अशी धमकी देऊन आरोपी पळून गेले. जेतवानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतिनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Web Title: One beaten in a trivial dispute in Nagpur