शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
4
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
5
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
7
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
8
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
9
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
10
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
11
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
12
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
13
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
14
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
15
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
16
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
17
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
18
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
19
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
20
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अबकी बार...

By admin | Updated: June 12, 2014 01:05 IST

आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला उत्तर नागपूर. उत्तर नागपुरात विधानसभेत उत्तरायण कोण करणार ? अबकी बार कोण ? बसपाच्या हत्तीवर कोण ? भाजपमध्ये बंडखोरी होईल का ? अशा महाचर्चांनी या

उत्तरेत उत्तरायण कोणाचे ? : भाजपची हेवीवेट टीम
जितेंद्र ढवळे - नागपूर
आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला उत्तर नागपूर. उत्तर नागपुरात विधानसभेत उत्तरायण कोण करणार ? अबकी बार कोण ? बसपाच्या हत्तीवर कोण ? भाजपमध्ये बंडखोरी होईल का ? अशा महाचर्चांनी या मतदारसंघातील वातावरण तापले आहे. उत्तर नागपुरात कॉँग्रेसचे कार्यकर्ते अबकी बार...? एवढेच बोलतात नंतर गप्प राहतात. काय आहे त्यांच्या मनात !
रिपब्लिकन पक्ष जिथे घडला. रुजला. चळवळींना रूप मिळाले. खोब्रागडे गटाचा गड उत्तर नागपूर. गडकरींच्या हेवीवेट टीमने येथे लोकसभेत उत्तरायण केले. १८,५४० मतांची आघाडी घेत गडकरींनी एका गाडीवर बसून प्रचार करणाऱ्या काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार आणि रोहयो मंत्री नितीन राऊत यांची हवा गुल केली. गडकरींच्या भाषेत ‘पंक्चर’ केले !
रिपब्लिकन पक्षाला गटबाजीने घेरल्यानंतर मतदारांनी काँग्रेसला या मतदार संघात डोक्यावर घेतले. मंत्री नितीन राऊत दीड दशकापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. यावेळीही राऊत यांचाच दावा आहे. मात्र त्यांच्या दावेदारीला आवाहन आहे,

राजा द्रोणकर या काँग्रेस कार्यकर्त्याचे. इंदोऱ्यातील बुद्धविहाराच्या पायऱ्यांवरील महाचर्चांत याचे उत्तर मिळेल !
१९९० मध्ये रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया खोब्रागडे गटाचे उपेंद्र शेंडे यांचा भाजपचे भोला बढेल यांनी १२ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. १९९० आणि २०१४ ची भाजप यात फरक आहे. ताकद वाढली आहे. तगडी टीम आहे.
१९७८ च्या निवडणुकीत सूर्यकांत डोंगरे या अपक्ष उमेदवाराने काँग्रेस (आय) चे बाळकृष्ण वासनिक यांचा पराभव केला होता. १९७८ आणि १९९० च्या निवडणुकांतील राजकीय समीकरणांना आज उत्तर नागपुरात महत्त्व आले आहे. लोक तसे बोलतातही. परवा राणी कोठी येथे झालेल्या समीक्षा बैठकीत काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या याच भावना होत्या.
इकडे भोला बढेल होण्यासाठी भाजपजवळ हेवीवेट टीम आहे. मात्र ती बाहेरची आहे. गेल्यावेळी भाजपने राजेश तांबे यांना मैदानात उतरविले होते. ते ४०, ०६७ मतांवर थांबले. तांबे २००४ मध्ये बसपाच्या हत्तीवर स्वार होते. ते लढले पण हरले. यावेळी तांबे यांच्या तोडीची सोनेरी टीम भाजपजवळ आहे. यात पहिले नाव आहे डॉ.मिलिंद माने यांचे. प्रत्येक गल्लीत माने याचे नेटवर्क आहे. गेल्यावेळी २३ हजार ६६२ मते मिळवीत माने यांनी राऊत यांना घाम फोडला होता. माने बाजी मारतील असा पोल पंडितांचा अंदाज होता. गणित चुकले. मानेंजवळ टीम होती, पण पक्ष नव्हता. यावेळी ते गडकरींच्या जवळ आहे, पण भाजपमध्ये नाही ! गेल्यावेळी बसपाच्या हत्तीवर स्वार झालेले धरमकुमार पाटील कोणत्या पक्षातून लढतील ? बसपाचा हत्ती त्यांना तितकाच जवळचा आहे. कारण उत्तर नागपूर आहे. येथील जातीय समीकरण वेगळे आहे. रिस्क कोण घेणार ?
राऊत यांच्या मंत्रिपदाच्या राजीनामा पत्रानुसार सांगायचे झाल्यास ‘सेक्युलर’ नागपुरातील दलितांची मते गडकरींना मिळाली. गडकरीसारखी रिस्क पाटील घेतील ? माजी आमदार भोला बढेल, संघाचे संघपाल उपरे यांचेही येथे नटवर्क आहे. त्यांचाही दावा आहे. माजी उपमहापौर संदीप जाधव आणि अनिल सोले यांच्या प्रचारात आघाडी घेणारे संदीप गवई ही जनरेशन नेक्स्ट भाजपजवळ आहे. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष धरमपाल मेश्राम यांचा दावा अधिक आहे.
उत्तरचे तिकीट वाटप करताना प्रदेश भाजपाला १०० गुणांची प्रश्नपत्रिकाच यावेळी तयार करावी लागणार आहे. जो अधिक प्रश्नांची उत्तर सोडवेल. त्यांनाच ‘उत्तर’चे तिकीट. येथे बसपाच्या हत्तीवर भाजपचे बंडखोर स्वार असेल. यात शंका नाही. विदेशातून उत्तर नागपुरात दाखल झालेले मधुसूदन गवई यांनाही बसपाचे तिकीट येथे मिळू शकते. बसपाचे तिकीट मिळविण्यासाठी ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गवई यांच्याजवळ आहेत!