शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

आता टाटा पॉवरचीही वीज वितरणात उडी; आयोगाकडे परवान्यासाठी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:16 IST

Nagpur : आयोगाकडे समांतर वीज वितरणासाठी अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात महावितरण, टोरंट पॉवर, अदानी इलेक्ट्रिसिटीनंतर आता टाटा पॉवरनेही वीज वितरणात उडी घेतली आहे. टाटा पॉवरने छत्रपती संभाजीनगर, जालना, बदनापूर, वाळूज या भागांत समांतर वीज वितरणासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे परवान्यासाठी अर्ज केला आहे.

सध्या महावितरण मुंबई वगळता संपूर्ण राज्यात वीज वितरणाचे काम पाहते. परंतु, टाटा पॉवरच्या या पावलानंतर मराठवाड्यासारख्या भागात देखील खासगी वीज वितरण कंपन्यांची स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. टाटा पॉवरने मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध करून नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या आहेत. आयोग सूचना व हरकतींचा विचार करून पुढील टप्प्यात जनसुनावणी घेणार आहे. याआधी आयोगाने टोरंट पॉवर व अदानी इलेक्ट्रिसिटी या कंपन्यांच्या नागपूर, पुणे, ठाणे, नवी मुंबई या भागांतील अर्जाना प्राधान्य देत २२ जुलै रोजी सुनावणी निश्चित केली आहे. टाटा पॉवरने मागणी केलेल्या परवान्यात छत्रपती संभाजीनगर महापालिका, चिकलठाणा एमआयडीसी, शेंद्रा एमआयडीसी, वाळूज एमआयडीसी, ऑरिक एमआयडीसी, जालना महापालिका क्षेत्र, बदनापूर नगर पंचायत, जालना एमआयडीसी, अतिरिक्त जालना एमआयडीसी, तसेच जालना सीड पार्क एमआयडीसी या १० भागांचा समावेश केला आहे.

पाच वर्षांत ३९ हजार ग्राहकांना सेवा देणारटाटा पॉवरच्या मते त्यांना वीज वितरणाचा परवाना मिळाल्यास पुढील पाच वर्षांत ते ३९ हजारांहून अधिक ग्राहकांना सेवा देतील. औद्योगिक व नागरी क्षेत्रांना दर्जेदार व सतत वीज पुरवठा करणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. या प्रक्रियेमुळे मराठवाडा विभागात वीज वितरणात स्पर्धा निर्माण होणार असून, याचा लाभ थेट ग्राहकांना मिळण्याची शक्यता आहे. आता महावितरणसमोर खासगी क्षेत्रातील स्पर्धक उभे राहत असल्याने दर, सेवा आणि गुणवत्तेवर परिणाम होणार आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरTataटाटाelectricityवीज