आता कमी 'बजेट'मध्येच सोन्याचे दागिने खरेदी करणे अधिक सोपे !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 20:17 IST2025-07-23T20:16:33+5:302025-07-23T20:17:04+5:30
९ कॅरेट दागिन्यांसाठी हॉलमार्किंग अनिवार्य : सराफा बाजारात नवचैतन्य

Now it's easier to buy gold jewelry on a low budget!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आता कमी बजेटमध्ये सोन्याचे दागिने खरेदी करणे अधिक सोपे झाले आहे. सरकारने ९ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग जुलैपासून अनिवार्य केले असून, यामुळे हलक्या वजनाचे, अधिक परवडणारे आणि खात्रीशीर दागिने ग्राहकांसाठी सहज उपलब्ध झाले आहेत. यापूर्वी १४ कॅरेटपासून पुढेच हॉलमार्किंग लागू होते. मात्र, आता त्यात ९ कॅरेटचा समावेश झाल्याने कमी उत्पन्न गटातील ग्राहकांनाही गुणवत्तेची खात्री देणारे दागिने खरेदी करता येणार आहेत.
हॉलमार्क सोन्याच्या दागिन्यांचा लाभ आता अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे. स्टैंडईसने (बीआयएस) ९ कॅरेट सोन्याचे दागिने विक्रीसाठी हॉलमार्किंग अनिवार्य करत जुलै २०२५ मध्ये यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. या निर्णयामुळे सराफा बाजारात नवचैतन्य निर्माण झाले असून, व्यापारीवर्गात उत्साहाचे वातावरण आहे. सरकारचा हा निर्णय सराफा व्यवसायाला गती देणारा आणि ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध करून देणारा ठरणार आहे, असे मत सराफांनी व्यक्त केले. विशेषतः कमी उत्पन्न गटातील ग्राहक, ग्रामीण भागातील खरेदीदार आणि युवावर्ग हॉलमार्क असलेले हलक्या वजनाचे व आकर्षक डिझाइनचे दागिने सहजपणे खरेदी करू शकतील. सोन्याच्या किमतीत झपाट्याने झालेल्या वाढीमुळे ग्राहकांचा कल आता ९ कॅरेट सोन्याच्या आकर्षक डिझाइन्सकडे वळणार आहे. स्वस्तात आणि स्टायलिश दागिन्यांच्या शोधात ग्राहक हलक्या कॅरेटच्या पयार्याकडे झुकू लागतील. हॉलमार्किंग प्रणाली प्रभावी करण्यासाठी भारतीय मानक ब्युरोने देशभरात केंद्रनिहाय विस्तार केला आहे. देशात सुमारे ३६१ जिल्ह्यांत हॉलमार्किंग केंद्र आहेत. पाच वर्षांत २५६ जिल्ह्यात जून-२०२१ मध्ये, दुसरा ३२ जिल्ह्यांत एप्रिल-२०२२ मध्ये, तिसरा ५५ जिल्ह्यांत सप्टेंबर २०२३ आणि चौथा टप्पा १८ जिल्ह्यांत नोव्हेंबर-२०२४ मध्ये लागू केला.
जून-२०२५ मध्ये विक्रीत मोठी घट
कोविड-१९ नंतर प्रथमच, जून २०२५ मध्ये देशभरात सोन्याच्या विक्रीत तब्बल ६० टक्के घट झाली असून, ही एक ऐतिहासिक घसरण ठरली आहे. ही घट मागील अनेक वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ
२२ जुलै २०२५ रोजी, २४ कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत ३ टक्के 'जीएसटी'सह १,०३,३०० प्रतितोळा इतकी झाली. यावर १३ ते १६ टक्के मेकिंग चार्जेस घेतले जात असल्यामुळे, ग्राहकांना २४ कॅरेट सोन्याचा दागिना सुमारे १.२० लाखांपर्यंत मिळेल. याउलट, ९ कॅरेट सोन्याचा दागिना 'जीएसटी'सह ३९ ते ४० हजार या दरात उपलब्ध आहे.