शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

आता जिल्हा शल्यचिकित्सकांकडून म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:08 IST

नागपूर : म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने यावरील औषधांचा तुटवडा पडला आहे. विशेषत: ‘अ‍ॅम्फोटेरिसिन-बी’ इंजेक्शनचा काळाबाजार होत ...

नागपूर : म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने यावरील औषधांचा तुटवडा पडला आहे. विशेषत: ‘अ‍ॅम्फोटेरिसिन-बी’ इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याची दखल घेत आता आरोग्य विभागामार्फत त्याची खरेदी करून सर्व जिल्ह्यांना जिल्हा शल्यचिकित्सकामार्फत पुरवठा करणे सुरू झाले. त्यानुसार शनिवारी नागपुरात ‘अ‍ॅम्फोटेरिसिन-बी लायपोसोमल’चे ६९६ व्हायल तीन शासकीय रुग्णालयांसह १९ खासगी रुग्णालयांना वाटप करण्यात आले.

मागील दोन ते तीन आठवड्यांपासून म्युकरमायकोसिसवरील औषधांचा प्रचंड तुटवडा पडल्याने रुग्णसेवाच अडचणीत आली होती. काळाबाजारात अव्वाच्या सव्वा किमतीत ही औषधे विकली जात होती. अखेर आरोग्य विभागाने याची खरेदी व वाटप प्रक्रिया हाती घेतल्याने रुग्णांनी व रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला. शनिवारी ‘अ‍ॅम्फोटेरिसिन-बी लायपोसोमल’ इंजेक्शनचे मेडिकलला ९०, मेयोला २४, शासकीय दंत रुग्णालयाला ४८, ट्रिनिटी हॉस्पिटलला ६, केअर हॉस्पिटलला १८, कानफाडे हॉस्पिटलला १२, गॅस्ट्रो हॉस्पिटलला १२, विम्स हॉस्पिटलला १८, क्रिटिकेअर हॉस्पिटलला १२, वेद क्लिनिकला १८, सिम्स हॉस्पिटलला २४, न्यू ईरा हॉस्पिटलला ६, अ‍ॅलेक्सीस हॉस्पिटलला ४२, ऑरेंज सिटी हॉस्पिटलला ४८, किंगस्वे हॉस्पिटलला ७२, सेव्हन स्टार हॉस्पिटलला १०२, न्यूरॉन हॉस्पिटलला ७२, निती क्लिनिक हॉस्पिटलला ४८, विवेका हॉस्पिटल, लता मंगेशकर हॉस्पिटल, एअर फोर्स हॉस्पिटलला व कुणाल हॉस्पिटलला प्रत्येकी सहा व्हायल देण्यात आले. खासगी रुग्णालयांनी रुग्णांच्या आवश्यकतेनुसार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात शुल्काची भरणा केल्यानंतर हे इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात आहे.