Corona Virus; आता शहरांतर्गत कोरोना चाचणीविना विमान प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 10:44 IST2021-06-02T10:43:51+5:302021-06-02T10:44:18+5:30
Nagpur News आता १ जूनपासून महाराष्ट्रात कुठेही विमानाने प्रवास करणाऱ्यांना राज्य शासनाने आरटीपीसीआर चाचणीत सवलत दिली आहे.

Corona Virus; आता शहरांतर्गत कोरोना चाचणीविना विमान प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रातील विमान प्रवाशांसाठी आठ राज्यांनी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक केला आहे; पण आता १ जूनपासून महाराष्ट्रात कुठेही विमानाने प्रवास करणाऱ्यांना राज्य शासनाने आरटीपीसीआर चाचणीत सवलत दिली आहे. यापूर्वी असलेली आरटीपीआर चाचणीची बंधने दूर झाल्याने महाराष्ट्रातील प्रवाशांना चाचणीविना राज्यात कुठेही विमान प्रवास करता येणार आहे; पण अन्य राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक आहे. याशिवाय राज्यातील प्रवाशांना देशातील आठ राज्यांमध्ये जाण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल जवळ बाळगणे बंधनकारक आहे.