कुख्यात समशेर टोळीच्या गुंडाचा हैदोस पिस्तुलाच्या धाकावर शिवीगाळ, धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 23:44 IST2021-04-30T23:32:56+5:302021-04-30T23:44:31+5:30

Notorious Samsher gangster chaos शहरातील जुन्या गँगस्टरपैकी एक असलेला कुख्यात गुंड समशेर काल्या याच्या गुंड मुलाने शुक्रवारी रात्री क्षुल्लक कारणावरून विरोधी गटातील तरुणांशी वाद घातला. त्यानंतर अश्लील शिवीगाळ करीत पिस्तूल काढून धमकावणे सुरू केले. या प्रकारामुळे हसनबाग परिसरात प्रचंड दहशत आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Notorious Samsher gangster chaos, threatens to fire by pistol | कुख्यात समशेर टोळीच्या गुंडाचा हैदोस पिस्तुलाच्या धाकावर शिवीगाळ, धमकी

कुख्यात समशेर टोळीच्या गुंडाचा हैदोस पिस्तुलाच्या धाकावर शिवीगाळ, धमकी

ठळक मुद्दे हसनबागमध्ये प्रचंड तणाव

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील जुन्या गँगस्टरपैकी एक असलेला कुख्यात गुंड समशेर काल्या याच्या गुंड मुलाने शुक्रवारी रात्री क्षुल्लक कारणावरून विरोधी गटातील तरुणांशी वाद घातला. त्यानंतर अश्लील शिवीगाळ करीत पिस्तूल काढून धमकावणे सुरू केले. या प्रकारामुळे हसनबाग परिसरात प्रचंड दहशत आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नागपुरातील गुंडांच्या जुन्या टोळ्यांच्या म्होरक्यापैकी एक असलेला कुख्यात समशेर काल्या आता वृद्ध झाला असला तरी, त्याची मुले त्याची टोळी चालवतात. ते अवैध धंद्यातही गुंतलेले आहेत. त्यामुळे या भागातील दुसऱ्या गुन्हेगारांशी त्यांचे वैर आहे. शुक्रवारी रात्री विरोधी टोळीतील काही गुंडांचा समशेरच्या मुलाच्या दुचाकीला कट लागला. त्यावरून त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर समशेरच्या मुलाने हसनबागमध्ये येऊन हैदोस सुरू केला. त्याने पिस्तूल काढली आणि तो अनेकांना शिवीगाळ करू लागला. त्याच्या टोळीतील तीन गुंड दुचाकीवरून आले आणि तेही विरोधी गटातील गुंडांना कापून टाकण्याची भाषा वापरू लागले. या प्रकारामुळे हसनबागमध्ये प्रचंड गर्दी जमली. दहशतीसोबत तणावही निर्माण झाला. घटनेची माहिती कळताच परिमंडल चारचे पोलीस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे, नंदनवनचे ठाणेदार मुक्तार शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या भागात धाव घेतली. पोलीस दिसताच गर्दी कमी झाली. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. वृत्त लिहिस्तोवर त्यांच्याकडून या घटनेबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू होता.

व्हिडिओ व्हायरल, शहरात खळबळ

या घटनेचा व्हिडिओ शुक्रवारी रात्री व्हायरल झाला. समशेरचा मोठा मुलगा पिस्तूल हातात घेऊन शिवीगाळ करीत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओने शहरात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. विशेष म्हणजे, समशेरच्या एका मुलाने काही दिवसांपूर्वी त्याच्या विरोधी गटातील गुंडाची निर्घृण हत्या केली होती. सध्या तो कारागृहात आहे.

Web Title: Notorious Samsher gangster chaos, threatens to fire by pistol